Join us  

सरकारचा एक मोठा निर्णय, तीन गेमिंग कंपन्यांचे बुडाले २,५७४ कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 4:45 PM

ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी लावण्याच्या निर्णयानंतर गेमिंग क्षेत्रातील तीन कंपन्यांचे शेअर्स कोसळले.

ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी लावण्याच्या निर्णयानंतर गेमिंग क्षेत्रातील तीन कंपन्यांचे शेअर्स कोसळले. ट्रेडिंग सत्रादरम्यान अवघ्या काही मिनिटांत, तिन्ही कंपन्यांच्या एकूण मार्केट कॅपमधून 2574 कोटी रुपये बुडाले. डेल्टा कॉर्पोरेशनला या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसला. ट्रेडिंग सत्रात कंपनीचे शेअर्स सुमारे 28 टक्क्यांनी घसरले. तर दुसरीकडे नझारा आणि ऑन मोबाइल ग्लोबलच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. 

डेल्टा कॉर्पला सर्वाधिक नुकसानडेल्टा कॉर्पने रिअल इस्टेट आणि टेक्सटाईल कन्सल्टिंग कंपनीसह कसिनो गेम आणि ऑनलाइन गेमिंगमध्येही आपला व्यवसाय वाढवला आहे. अशा परिस्थितीत कसिनो आणि ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचा शेअर जवळपास 28 टक्क्यांनी घसरला. त्यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 1,836.91 कोटी रुपयांची घसरण झाली. कामकाजाच्या अखेरच्या सत्रात शेअरमध्ये 22.98 टक्क्यांची घसरण होऊन तो 190 रुपयांवर बंद झाला.

नझाराचे शेअर्सही आपटलेदुसरीकडे, ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म नझारा टेकच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. ट्रेडिंग सत्रात कंपनीचा शेअर 14 टक्क्यांपर्यंत घसरला. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 671.67 कोटी रुपयांनी कमी झाले. कामकाजाच्या अखेरच्या सत्रात कंपनीचा शेअर 3.33 टक्क्यांच्या घसरणीसह 683 रुपयांवर बंद झाला.

या कंपन्यांनाही नुकसानB2C क्लाउड गेमिंग प्लॅटफॉर्म Onmo Global चे शेअर्स देखील ट्रेडिंग सत्रादरम्यान 8 टक्क्यांपर्यंत घसरले आणि कंपनीला मार्केट कॅपमधून 65.55 कोटी रुपयांचं नुकसान झालं. कंपनीचा सुरुवातीच्या सत्रात 76.44 वर उघडला आणि ट्रेडिंग सत्रादरम्यान 73.21 रुपयांच्या लो लेव्हलवर पोहोचला होता. कामकाजाच्या अखेरच्या सत्रात कंपनीचा शेअर यात थोडी रिकव्हरी दिसली आणि तो 1.13 टक्क्यांच्या घसरणीसह 78.50 रुपयांवर बंद झाला.

टॅग्स :शेअर बाजारसरकारजीएसटी