Lokmat Money >शेअर बाजार > Suzlon Energy बाबत मोठी अपडेट, एक वृत्त आणि शेअरनं पकडला रॉकेट स्पीड

Suzlon Energy बाबत मोठी अपडेट, एक वृत्त आणि शेअरनं पकडला रॉकेट स्पीड

Suzlon Energy Share Price : विंड एनर्जी कंपनी सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 03:46 PM2024-10-09T15:46:24+5:302024-10-09T15:46:24+5:30

Suzlon Energy Share Price : विंड एनर्जी कंपनी सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.

A big update on Suzlon Energy a news and the share has reached rocket speed intraday high tata power bid | Suzlon Energy बाबत मोठी अपडेट, एक वृत्त आणि शेअरनं पकडला रॉकेट स्पीड

Suzlon Energy बाबत मोठी अपडेट, एक वृत्त आणि शेअरनं पकडला रॉकेट स्पीड

Suzlon Energy Share Price : विंड एनर्जी कंपनी सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बुधवारी सुझलॉन एनर्जीचा शेअर ९ टक्क्यांहून अधिक वधारून ८०.५९ रुपयांवर पोहोचला. मात्र कामकाजाच्या अखेरिस शेअर थोडा घसरून ७७.१० रुपयांवर आला. सलग दुसऱ्या दिवशी कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. सुझलॉन एनर्जीच्या प्राइस बँडमध्ये बदल करण्यात आलाय. कंपनीच्या शेअर्सची प्राइस बँड आता ५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. सुझलॉन एनर्जीचा स्टॉक अतिरिक्त देखरेखीच्या (ASM) फ्रेमवर्कमधून काढून टाकल्यानंतर प्राइस बँड रिव्हिजन करण्यात आलं आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ८६.०४ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २६.२० रुपये आहे.

टाटा पॉवरला विंड टर्बाइन पुरविण्यासाठी सुझलॉन एनर्जी निविदा जिंकण्यासाठी स्पर्धा करत आहे. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. सिमेन्स गेम्सा, सेन्व्हियन इंडिया, इनव्हिजन एनर्जी आणि सुझलॉन एनर्जीसह विंड टर्बाइन ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स हे कंत्राट मिळवण्यासाठी स्पर्धा करत आहेत. टाटा पॉवरनं एकूण ३ गिगावॅट क्षमतेच्या विंड टर्बाइन पुरवठ्यासाठी निविदा मागविल्या आहेत.

वर्षभरात शेअर १८५ टक्क्यांनी वधारला

गेल्या वर्षभरात सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये १८५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ९ ऑक्टोबर २०२३ रोजी कंपनीचा शेअर २७.६९ रुपयांवर होता. सुझलॉन एनर्जीचा शेअर ९ ऑक्टोबर २०२४ रोजी ८०.५९ रुपयांवर पोहोचला आहे. तर या वर्षी आतापर्यंत विंड ऊर्जा कंपनीच्या शेअर्समध्ये १०५ टक्क्यांची वाढ झाली आहे. १ जानेवारी २०२४ रोजी कंपनीचा शेअर ३८.४८ रुपयांवर होता. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनीच्या शेअरनं ८० रुपयांचा टप्पा ओलांडला. गेल्या सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये ९३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: A big update on Suzlon Energy a news and the share has reached rocket speed intraday high tata power bid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.