Join us

शेअर बाजाराला उधाण, तरीही ६० टक्के कंपन्यांनी दिला तोटा! अनेक कंपन्यांचा लॉक इन पीरियड या महिन्यात संपणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 8:01 AM

भारतीय शेअर बाजाराने या वर्षी जगभरातील शेअर बाजारांच्या तुलनेत उत्तम रिटर्न दिले आहेत.

मुंबई :

भारतीय शेअर बाजाराने या वर्षी जगभरातील शेअर बाजारांच्या तुलनेत उत्तम रिटर्न दिले आहेत. महागाईच्या कारणामुळे झालेली व्याजदरवाढ, रशिया- युक्रेन संकटांमुळे आलेल्या मोठ्या अस्थिरतेनंतरही भारतीय बाजार उच्चांकी आकड्यांपासून अगदी काही पावले दूर आहे. 

बाजार एकीकडे उच्चांकी स्तरावर असताना ६० टक्क्यांपेक्षा अधिक कंपन्यांनी नकारात्मक परतावा दिला आहे. केवळ २१ टक्के कंपन्यांनी ऑक्टोबर २०२१ पासून आतापर्यंत २० % पेक्षा अधिक परतावा दिला आहे. तर २०२२ मध्ये आयपीओ आणणाऱ्या १० कंपन्यांचा लॉक इन पीरियड संपत असून गुंतवणूकदार शेअर विकू शकतात.

यामुळे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. यातील ६० टक्के कंपन्यांचे शेअर्स अगोदरच इश्यू प्राइजच्या खाली ट्रेड करत आहेत. बाजाराचा निर्देशांक ऑक्टोबर २०२१ मध्ये ६१,४७५ या उच्चांकी स्तरावर पोहोचला होता, तो आता ॲक्टोबरमध्ये पुन्हा ६१,१८६ अंकावर पोहोचला होता.

बाजार घसरेल का? 

  • नोव्हेंबर महिन्यात १४ अब्ज डॉलरच्या किमतीच्या न्यूएज शेअर्सचा लॉक इन पीरियड संपत आहे. यामुळे शेअर्समध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. 
  •  झोमॅटोचा लॉक इन पीरियड संपल्यानंतर कंपनीचे शेअर्स २१ टक्क्यांनी कोसळले होते, त्यामुळे ही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
  • ६१,४७५ हा उच्चांकी गाठण्यापासून बाजाराचा निर्देशांक केवळ ४४२ अंक खाली
  • १८,२०३ चा स्तर गाठण्यासाठी निफ्टीला केवळ काही अंश वाढीची गरज. यामुळे बाजारात गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न मिळाले आहेत. 
  • १,४०० कोटी डॉलरचे शेअर्स नोव्हेंबरमध्ये लॉक इनपासून मुक्त होणार
  • १५ कंपन्यांचा लॉक इन डिसेंबरपर्यंत संपणार
     
टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांक