Join us  

शेअर बाजारातील घसरणीला अखेर ब्रेक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 9:21 AM

शेअर बाजारात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला अखेर ब्रेक लागला.

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शेअर बाजारात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला अखेर ब्रेक लागला. सेन्सेक्स ७८ अंकांनी वधारून ५७,६३४वर, तर निफ्टी १३ अंकांनी वधारून १६,९८५ अंकांवर बंद झाला. दिवसभरात शेअर बाजरात अस्थितरता कायम हाेती. स्वित्झर्लॅंडमधील बॅंक ‘क्रेडिट सुइस’ अडचणीत आल्यानंतर गुंतवणूकदारांचे लक्ष तेथील परिस्थितीकडे वळले. 

अमेरिकेतील बुडालेल्या बॅंका आणि क्रेडिट सुसेवरील संकट निवळले असले तरीही गुंतवणूकदारांचा विश्वास परतलेला नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी माेठ्या प्रमाणावर विक्री केली असून, साेन्यात गुंतवणूक वाढविली आहे. त्यामुळे साेन्याचे दरही पुन्हा वाढताना दिसत आहेत.

क्रेडिट सुइस घेणार कर्ज 

जिनेव्हा : क्रेडिट सुइसने स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बॅंकेकडून ५४ अब्ज डाॅलर्सपर्यंतचे कर्ज घेणार असल्याचे जाहीर केले. आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बॅंकेने म्हटले आहे. बॅंकेचे शेअर्स काेसळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर शेअर्सचे भाव ३० टक्क्यांनी वधारले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :शेअर बाजार