Join us  

शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; नफावसूलीमुळे सेन्सेक्स ४०० आणि निफ्टी १२२ अंकांनी घसरुन बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 4:04 PM

Stock Market Closing On 11 September 2024: दोन दिवसांच्या तेजीनंतर बुधवारी शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक लागला. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनच्या दुपारी नफावसूलीमुळे बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली.

Stock Market Closing On 11 September 2024: दोन दिवसांच्या तेजीनंतर बुधवारी शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक लागला. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनच्या दुपारी नफावसूलीमुळे बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. दिवसभरातील उच्चांकी पातळीवरून सेन्सेक्स ७०० अंकांनी तर निफ्टी २३० अंकांनी घसरला. 

एनर्जी, ऑईल अँड गॅस आणि बँकिंग शेअर्समधील विक्रीमुळे बाजारात ही घसरण दिसून आली आहे. आजच्या व्यवहाराच्या अखेरीस बीएसई सेन्सेक्स ३९८ अंकांनी घसरून ८१,५२३ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२३ अंकांच्या घसरणीसह २४,९१८ अंकांवर बंद झाला.

'या' शेअर्समध्ये तेजी / घसरण 

सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी केवळ १० शेअर्स वधारले, तर २० शेअर्समध्ये घसरण झाली. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी केवळ १३ शेअर्स वधारले तर ३७ घसरले. एशियन पेंट्स २.१८ टक्के, बजाज फायनान्स १.५७ टक्के, सन फार्मा ०.८८ टक्के, एचयूएल ०.५८ टक्के, एचसीएल टेक ०.३९ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.३७ टक्के, आयटीसी ०.१९ टक्के, अॅक्सिस बँक ०.०८ टक्के, भारती एअरटेल ०.०५ टक्क्यांनी वधारले. 

तर दुसरीकडे टाटा मोटर्स ५.७७ टक्के, एनटीपीसी १.५६ टक्के, अदानी पोर्ट्स १.५३ टक्के, एल अँड टी १.५१ टक्के, एसबीआय १.४५ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील १.४२ टक्क्यांनी घसरून बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजार