पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे (Election Results 2023) निकाल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारानं वेग पकडला होता. पण गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली शेअर बाजारातील वादळी वाढ गुरुवारी थांबली आणि बीएसईच्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स (Sensex) 250 हून अधिक अंकांनी घसरला. दरम्यान, पेटीएम (Paytm Share) शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं मोठे नुकसान झाले आहे. बाजार उघडताच पेटीएमच्या शेअरला लोअर सर्किट लागलं.
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात जोरदार वाढ झाली होती. तसंच सेन्सेक्स आणि निफ्टी दररोज नवीन उंची गाठत होते. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आठवड्याच्या पहिल्या सोमवारी सेन्सेक्स 1300 अंकांच्या वाढीसह बंद झाला होता, तर निफ्टीही रॉकेट वेगाने 21,000 च्या पातळीवर पोहोचला होता. मात्र गुरुवारी बाजारातील वाढीचं सत्र थांबलं आणि त्यात घसरण झाली. वृत्त लिहिपर्यंत बीएसई सेन्सेक्स 270.66 अंकांनी घसरून 69,380.06 च्या पातळीवर व्यवहार करत होता. सकाळी 9.15 वाजता सेन्सेक्स 69,694 च्या पातळीवर उघडला.
सेन्सेक्ससोबतच निफ्टी-50 मध्येही घसरण झाली असून हा निर्देशांक 20,932 च्या पातळीवर उघडला आणि बातमी लिहिपर्यंत तो सुमारे 60 अंकांनी घसरून 20,877 च्या पातळीवर व्यवहार करत होता. दरम्यान, ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएम शेअरच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. बाजार उघडताच या शेअरमध्ये 20 टक्क्यांची घसरण झाली आणि शेअरला लोअर सर्किट लागलं.
शेअर बाजाराच्या तुफान तेजीला ब्रेक, सेन्सेक्स २७० अंकांनी आपटला; Paytm ला सर्वाधिक नुकसान
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली शेअर बाजारातील वादळी वाढ गुरुवारी थांबली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 10:15 AM2023-12-07T10:15:35+5:302023-12-07T10:15:46+5:30