Small-cap stock under ₹5: स्मॉल-कॅप कंपनी विकास लाइफकेअरने ₹97 कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा केली आहे. निधी उभारण्याचं काम प्रेफरन्शिअल बेस्डवर नवे इक्विटी शेअर्स जारी करुन केलं जाणार आहे. प्रेफरन्शिअल इश्यू प्राईज ₹4 प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आली आहे. शेअर बाजारात ही बातमी समोर आल्यानंतर गुरुवारी स्मॉल कॅप शेअरमध्ये जोरदार वाढ दिसून आली. एनएसईवर हा शेअर ₹5.05 च्या इंट्राडे हायवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांची तेजी दिसून आली.
हा स्मॉल-कॅप पेनी स्टॉक बीएसई आणि एनएसई दोन्हीवर ट्रेडिंगसाठी उपलब्ध आहे आणि एनएसईवर त्याचा सध्याचा ट्रेड व्हॉल्यूम 2,55,03,418 आहे. ₹5 च्या खाली असलेला हा पेनी स्टॉक एनएसईवर ₹5.40 प्रति शेअर या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. तर एनएसईवर त्याची 52-आठवड्यांचा नीचांकी स्तर ₹2.70 प्रति शेअर आहे.
कंपनीनं काय म्हटलं
प्रेफरेन्शिअल वाटपासाठी इश्यू प्राईज 4 प्रति वॉरंटवर 97 कोटी रुपयांच्या रोख मोबदल्यात निश्चित करण्यात आली आहे. ती भागधारकांची मंजूरी आणि इतर वैधानिक मंजुरींच्या अधीन असल्याचं फाइलिंगमध्ये म्हटलं आहे. त्यासाठी सदस्यांची संमती मागणाऱ्या नोटीसमध्ये त्यानुसार सुधारणा करण्यात आली आहे. 30 सप्टेंबर 2023 रोजी कंपनी त्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणार आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)