Join us  

कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, शेअरनं दिला 250% परतावा; खरेदीसाठी लोकांची झुंबड, तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 7:13 PM

या क्युपिड शेअरची किंमत आज वाढीसह खुली झाली आणि तो प्रति शेअर ₹914 अशा इंट्राडे उच्चांकावर पोहोचली.

क्युपिड लिमिटेडच्या शेअरने या वर्षी 2023 मध्ये मल्टीबॅगर परतावा दिला आहे. वार्षिक आधारावर हा शेअर 250 टक्क्यांनी वधारला आहे. या क्युपिड शेअरची किंमत आज वाढीसह खुली झाली आणि तो प्रति शेअर ₹914 अशा इंट्राडे उच्चांकावर पोहोचली. ही किंमत एनएसईवर याच्या सोमवारचा बंद भाव ₹863 च्या तुलनेत जवळपास 6 टक्के अधिक आहे. या शेअरचा वर्तमान लाइफटाइम उच्चांक ₹925 प्रति शेअर आहे.

अशी आहे शेअर प्राइस हिस्ट्री -क्यूपिड शेअर हा भारतीय शेअर बाजारातील मल्टीबॅगर शेअर्सपैकी एक आहे. गेल्या एका महिन्यात, हा फार्मा स्टॉक प्रति शेअर सुमारे ₹748 वरून ₹914 पर्यंत पोहोचला आहे. या कालावधीत या शेअरने सुमारे 20 टक्के एवढा परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत, या फार्मा कंपनीचा स्टॉक ₹246 प्रति शेअरवरून ₹914 प्रति शेअरच्या पातळीवर पोहोचला आहे. या कालावधीत या शेअरने 175 टक्के एवढा परतावा दिला आहे.

YTD काळात हा शेअर ₹268.50 वरून ₹914 प्रति शेअरवर पोहोचला आहे. यामुळे 2023 मध्ये या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना जवळपास 250 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे.

कंपनीनं केलीय अशी घोषणा -ताज्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये, क्युपिड लि.ने मुंबईजवळील एका औद्योगिक परिसरात एक जमीन खरेदी करण्याची घोषणा केली आहे. या खरेदीनंतर कंपनीची उत्पादन क्षमता वाढेल, परिणामी जागतिक बाजारपेठेत तिची पोझिशनही वाढेल. ही भारतातील पहिली महिला कंडोम निर्माता कंपनी आहे. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक