मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून येत आहे. कंपनीचा शेअर आज आपल्या विक्रमी पातळीवर ट्रेड करत आहे. आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी कंपनीचा शेअर 4.41 टक्क्यांची उसळी घेतली आहे. आज कंपनीचा शेअर 2749 रुपयांवर व्यवहार करत आहे. तसेच, शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 2756 रुपये एवढा आहे.
कोणत्या पातळीवर ट्रेड करतोय कंपनीचा शेअर? -
कंपनीचा शेअर आज 4.41 टक्के अर्थात 116.25 रुपयांच्या तेजीसह 2749 रुपयांवर ट्रेड करत आहे. तसेच, गेल्या 5 दिवसांत कंपनीचा शेअर 6.06 टक्के अर्थात 157 रुपयांच्या तेजीसह 2749.85 रुपयांवर ट्रेड करत आहे.
रिलायन्स घेतला असा निर्णय -
रिलायन्सने आपला आर्थिक सेवांसंदर्भातील उपक्रम रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (RSIL) मध्ये विभाजित करण्याची आणि त्याचे नाव बदलून Jio Financial Services Limited (JFSL) म्हमून सूचिबद्ध करण्याची घोषणा यापूर्वीच केली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरधारकांना प्रत्येक शेअरसाठी बदल्यात एक जियो फायनान्शिअल सर्व्हिसेसचा शेअर दिला जाईल. डिमर्जरची प्रक्रिया पूर्ण झाल्यातंर, जिओ फायनान्शिअल भारतीय स्टॉक एक्सचेन्ज आणि एनएसईवर लिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
मिळतील अशा सुविधा -
ही कंपनी मालमत्तेनुसार ग्राहक आणि व्यावसायिकांना कर्जाची सुविधा देईल. याच बरोहबर ही कंपनी विमा, पैसा पुरवणे, डिजिटल ब्रोकिंग आणि मालमत्ता व्यवस्थापन सेवा देखील देईल. रिलायन्सच्या प्रत्येक शेअरधारकाला मूळ कंपनीच्या एका शेअरवर नव्या कंपनीचा एक शेअर मिळेल.