Join us  

Tata चा एक निर्णय अन् रॉकेट बनला शेअर, तज्ज्ञ म्हणतायत आणखी वाढणार किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 1:34 PM

कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका मोठा निर्णयानंतर आली आहे.

टाटा समूहाच्या शेअरमध्ये आज जबरदस्त तेजी बघायला मिळाली. हा शेअर टाटा मोटर्सचा असून आज 1 टक्यापेक्षाही अधिक वधारला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका मोठा निर्णयानंतर आली आहे. खरे तर, टाटा मोटर्सने 1 एप्रिल 2023 पासून आपल्या कमर्शिअल वाहनांच्या किमतीत पाच टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

कंपनीनं काय सांगितलं? - कंपनीने म्हटले आहे की, 1 एप्रिलपासून लागू होणार्‍या BS-VI उत्सर्जन मानदंडांच्या दुसऱ्या टप्प्याच्या पार्श्‍वभूमीवर, या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. तसेच, किमतीतील ही वाढ कमर्शियल वाहनांच्या सर्वच श्रेणींसाठी लागू असेल. ही वाढ वेगवेगळ्या मॉडेल आणि व्हर्जननुसार, वेगवेगळी राहील. कंपनीने म्हटले आहे, ‘‘टाटा मोटर्स एप्रिल महिन्यात आपल्या कमर्शियल वाहनांच्या किंमतीत पाच टक्क्यांपर्यंतची वाढ करेल.''

शेअर्सची किंमत वाढणार! -ब्रोकरेज आणि विश्लेषक या शेअरसंदर्भात पॉझिटिव्ह आहेत. जपानी ब्रोकरेज नोमुराने या शेअरचे टार्गेट प्राइस 508 रुपये ठेवले आहे. तसेच हा शेअर खरेदी करण्याचा सल्लाही दिला आहे. शेअरखानने याचे टार्गेट प्राइस 516 रुपये ठेवले असून याला 'बाय' रेटिंगही दिले आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :टाटाशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक