Lokmat Money >शेअर बाजार > Jim Rogers Warns Market Collapse : कर्जाच्या बोजामुळे आणखी कोसळणार जागतिक बाजार; प्रख्यात अमेरिकन गुंतवणूकदाराचं भाकीत

Jim Rogers Warns Market Collapse : कर्जाच्या बोजामुळे आणखी कोसळणार जागतिक बाजार; प्रख्यात अमेरिकन गुंतवणूकदाराचं भाकीत

Jim Rogers Warns Market Collapse : वाढत्या कर्जामुळे अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांसमोर मोठी समस्या उभी राहिली असल्याचं या दिग्गज गुंतवणूकदारानं म्हटलंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 08:25 AM2024-08-08T08:25:52+5:302024-08-08T08:26:17+5:30

Jim Rogers Warns Market Collapse : वाढत्या कर्जामुळे अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांसमोर मोठी समस्या उभी राहिली असल्याचं या दिग्गज गुंतवणूकदारानं म्हटलंय.

A famous American investor jim rogers predicts that the world market will collapse further due to debt burden | Jim Rogers Warns Market Collapse : कर्जाच्या बोजामुळे आणखी कोसळणार जागतिक बाजार; प्रख्यात अमेरिकन गुंतवणूकदाराचं भाकीत

Jim Rogers Warns Market Collapse : कर्जाच्या बोजामुळे आणखी कोसळणार जागतिक बाजार; प्रख्यात अमेरिकन गुंतवणूकदाराचं भाकीत

अमेरिकेतील मंदी आणि इस्रायल- इराण युद्धाच्या सावटामुळे मागील दोन दिवस जगभरातील बाजार गटांगळ्या खात आहेत. या पार्श्वभूमीवर वाढत्या कर्जाच्या बोज्यामुळे भविष्यात जागतिक बाजारांमध्ये आणखी मोठी घसरण होणार आहे, असं भाकीत अमेरिकेतील प्रख्यात गुंतवणूकदार जिम रॉजर्स यांनी वर्तवलं आहे.

वाढत्या कर्जामुळे अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. येणाऱ्या काळात विक्रीची जोरदार मारा होईल. हा कालखंड सर्वात खराब असेल. मोठ्या पडझडीची मी वाट पाहत आहे. या काळासाठी गुंतवणूकदारांनी आपल्याजवळ रोकड राखून ठेवणं गरजेचं आहे, असं जिम रॉजर्स म्हणाले. 

'गुंतवणूकदारांकडे बारकाईने पाहा'

लहान गुंतवणूकदारांना सल्ला देताना जिम रोजर्स यांनी "मोठे गुंतवणूकदार आधीच जवळचे शेअर्स विकून मोठ्या प्रमाणात पैशांची जमवाजमव करीत आहेत याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे," असा सल्ला दिला

वॉरेन बफेट यांचाही शेअर्स विक्रीवर भर

  • अमेरिकेतील मंदी व मध्य पूर्वेतील तणाव यामुळे येऊ घातलेल्या संकटाची कल्पना प्रख्यात गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांना होती.
  • त्यामुळे वॉरन बफेट यांच्या बर्कशायर हाथवेने जवळील शेअर विकण्यावर भर दिला होता. जून तिमाहीत वॉरन बफेट यांच्याजवळ असलेली रोकड तब्बल २७७ अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती.

Web Title: A famous American investor jim rogers predicts that the world market will collapse further due to debt burden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.