Jet Airways Share Price: Jet Airways Latest News: एव्हिएशन रेग्युलेटर डीजीसीएकडून विमान कंपनी जेट एअरवेजला एअरपोर्ट ऑपरेटर सर्टिफिकेट (AOC) जारी करण्यात आलंय. यानंतर आता कंपनीच्या विमानांचा पुन्हा भारतात उड्डाण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २८ जुलै रोजी डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडून एअरपोर्ट ऑपरेटर सर्टिफिकेटचं रिन्यूअल मिळालं असल्याचं जालान कालरॉक कन्सोर्टियमकडून जारी निवेदनात म्हटलंय. ही माहिती समोर आल्यानंतर बीएसईवर जेट एअरवेजच्या शेअर्सची किंमत ५ टक्क्यांच्या वाढीसह ५०.८० रुपयांवर पोहोचला.
जेट एअरवेजला पुन्हा सुरू करण्यासाठी काम करत असलेली जालान-कालरॉक कन्सोर्टियमनं यावर आनंद व्यक्त केलाय. नियामकावरचा आमच्यावर भरवसा कायम आहे हे यावरून दिसून येत असल्याची प्रतिक्रिया यानंतर जेट एअरवेजकडून देण्यात आलीये. जालान-कालरॉक कन्सोर्टियमकडून यानंतर एक निवेदनही जारी करण्यात आलंय. डीजीसीए आणि सर्वांना आम्ही धन्यवाद देतो, ज्यांनी जेट एअरवेजला पुन्हा सुरूव करण्यासाठी भरवसा व्यक्त केला असं जालान-कालरॉक कन्सोर्टियमनं नमूद केलंय.
जालान-कालरॉक कन्सोर्टियम पूर्णपणे जेट एअरवेजला पुन्हा उभं करण्यासाठी वचनबद्ध आहे. यासाठी जालान-कालरॉक कन्सोर्टियम सर्व अथॉरिटी, इंडस्ट्री आणि सर्वांसह एकत्र मिळून काम करेल. एअरलाईन्सला यशस्वी बनवण्यासाठी आम्ही एक स्ट्रॅटजीही तयार करत आहोत, असंही त्यांनी निवेदनात म्हटलंय.
शेअरची किंमत
या शेअरची किंमत सोमवारी कामकाजादरम्यान ५०.८० रुपयांच्या स्तरावर पोहोचली. गेल्या सत्रात या शेअरची किंमत ४८.३९ रुपये होती. कामकाजाच्या गेल्या ५ दिवसांमध्ये शेअरच्या किंमतीत २१.५० टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. सध्या कंपनीच्या शेअरची किंमत महिन्याभरापूर्वीच्या स्तरापेक्षा ५.२६ टक्क्यांनी अधिक आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर १०७ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३५.५५ रुपये आहे.