शेअर बाजारात घसरण झाली असतानाही सोमवारी नॅशनल स्टँडर्ड इंडियाच्या (National standard India) शेअर्समध्ये जबरदस्त तेजी बघायला मिळाली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये आजही 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट होते. यापूर्वीच्या व्यवहाराच्या दिवशी हा शेअर सातत्याने अप्पर सर्किटमध्ये होता. गेल्या पाच दिवसांत हाशेअर जवळपास 70 टक्क्यांनी म्हणजेच 2,812 रुपयांवर पोहोचला आहे.
कंपनीच्या शेअर्समध्ये तेजीचे कारण -
National standard India च्या शेअर्समध्ये ही तेजी डिसेंबर तिमाहीच्या परिणामांनंतर, दिसून येत आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात डिसेंबर तिमाहीच्या परिणामांसंदर्भात माहिती दिली. या तिमाहीत कंपनीचे इनकम 855 कोटी रुपये तर खर्च 375 कोटी रुपये एवढा राहिला आहे. गेल्या एका वर्षाच्या तुलनेत इनकम डबल आहे, तर खर्चातही वाढ झाली आहे.
कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी? -
व्यापाराच्या शेवटी National standard ची स्टॉक प्राईस बीएसई इंडेक्सवर 6,852.70 रुपये एवढी आहे. एक दिव आधीच्या तुलनेत स्टॉकमध्ये 20 टक्क्यांची तेजी आहे. हा स्टॉक व्यवहारादरम्यान 6852.70 रुपयांपर्यंत पोहोचला. अर्थात पाच दिवसांत 2,812.7 रुपयांपर्यंत वधारला. कंपनीचे मार्केट कॅप 13,705.40 कोटी रुपये एवढे आहे.