Join us

याला म्हणतात धमाका! एक बातमी अन् ₹1 च्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 6:43 PM

शुक्रवारपूर्वी, या स्मॉल-कॅप स्टॉकने 5, 8 आणि 9 एप्रिल रोजीही अप्पर सर्किटला स्पर्श केला होता.

भारतीय शेअर बाजारात गेल्या शुक्रवारी कमकुवत स्थिती असतानाही टीमो प्रोडक्शन्स एचक्यू लिमिटेडच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी झाली. बुधवारी 2024 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. यानंतर, टीमो प्रॉडक्शन एचक्यू लिमिटेडच्या ​​शेअरला 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते. ₹5 च्या खाली असलेला हा पेनी स्टॉक शुक्रवारी NSE वर ₹1.25 वर खुला झाला होता आणि नंतर अप्पर सर्किट लागले होते. शुक्रवारपूर्वी, या स्मॉल-कॅप स्टॉकने 5, 8 आणि 9 एप्रिल रोजीही अप्पर सर्किटला स्पर्श केला होता.

सातत्याने देतोय परतावा -महत्वाचे म्हणजे, हा पेनी स्टॉक NSE आणि BSE दोन्हीवरही ट्रेडिंगसाठी उपलब्ध आहे. याचे मार्केट कॅप ₹107 कोटी आहे. तर NSE वरील याचे सध्याचे ट्रेड व्हॉल्यूम ₹16.88 लाख एवढे आहे. या शेअरचा 52-आठवड्यांचा उच्चांक ₹3.32 तर नीचांक ₹0.74 एवढा आहे. कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी तिमाही परिणामांनंतर आली आहे. कंपनीने बुधवारी सायंकाळी मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. 

Q4FY24 स्मॉल-कॅप कंपनीचा खर्च QoQ आणि YoY दोन्हीमध्येही हमी झाला आहे. कंपनीने जानेवारी ते मार्च 2024 तिमाहीत एकूण ₹111.20 कोटी खर्चाची नोंद केली. जो  2023-24 या आर्थिक वर्षाच्या मागील तिमाहीत ₹129.90 कोटी होता. अर्थात, कंपनीला आपल्या खर्चावर नियंत्रण करण्यास यश मिळाले आहे. या स्मॉल-कॅप कंपनीने दर वर्षी आपल्या खर्चात सुधारणा केली आहे. कारण 4FY23 मध्ये कंपनीचा एकूण खर्च ₹375.62 कोटी एवढा होता.

Q4FY24 मध्ये कंपनीचा एकूण नफा ₹3.47 कोटी एवढा होता. जो गेल्या तिमाहीत ₹1.94 कोटी आणि Q4FY23 मध्ये ₹1.43 कोटी होता. अर्थात कंपनीचा एकूण नफा 80 टक्के वाढला आहे. कंपनीने वार्षिक आधारावर 140 टक्के एवढी वाढ नोंदवली आहे. 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार