नवी दिल्ली-
पेनी स्टॉकमधून अनेकदा गुंतवणूकदार कमीत कमी वेळेत जबरदस्त नफा कमावतात. वर्षभरात गुंतवणूक केलेली रक्कम अनेक पटीनं परत मिळते. तर काही वेळा गुंतवलेला संपूर्ण पैसा एका क्षणात संपतो. असाच एक राज रेयॉन नावाचा पेनी स्टॉक आहे की ज्यात गुंतवणूक केलेल्यांना जबरदस्त नफा मिळाला आहे. एका वर्षात या कंपनीच्या शेअरनं १५७० टक्के मल्टीबॅगर रिटर्न्स दिले आहेत. तर गेल्या एका महिन्यात गंतवणुकदारांना ३९ टक्के रिटर्न मिळाले आहेत.
पाच वर्षाच्या कालावधीत या स्टॉकमध्ये ८९२० टक्के उसळी पाहायला मिळाली आहे. तसंच या स्टॉकमध्ये सातत्यानं तेजी पाहायला मिळाली आहे. आजही राज रेयॉनचा शेअर ग्रीन ट्रेडिंगमध्ये आहे.
पाच वर्षांपूर्वी २७ ऑक्टोबर २०१७ साली राज रेयॉनच्या शेअरची किंमत फक्त २५ पैसे इतकी होती. पाच वर्षांपूर्वी जर एखाद्यानं २५ पैशांच्या रेटनं दोन लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची सध्याच्या घडीला किंमत ८० लाख रुपये इतकी झाली असेल. गेल्या सहा महिन्यातील शेअरच्या किमतीवर नजर टाकली तर तो ३.६० रुपयांपासून २२.५५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
आजही शेअरची किंमत वधारली
राज रेयॉनच्या शेअरमध्ये आजही वाढ पाहायला मिळत आहे. कंपनीचा शेअर १.८१ टक्क्यांवरुन वाढून २२.५५ रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या पाच दिवसांपासून या स्टॉकमध्ये पाच टक्क्यांहून अधिक तेजी पाहायला मिळत आहे. याचा ५२ आठवड्यांची सर्वोच्च पातळी २२.५५ रुपये इतकी होती.
तज्ज्ञांचं मत
तज्ज्ञांच्या मतानुसार कोणत्याही कंपनीचा शेअर खरेदी करण्याआधी कंपनीची संपूर्ण माहिती जाणून घेतली पाहिजे. कंपनीच्या व्यवहारापासून गेल्या कंपनीच्या गेल्या वर्षाच्या नेट प्रॉफिट आणि मिळकतीची माहिती घेतली पाहिजे. याशिवाय कंपनीची भविष्यातील कामगिरी, प्रोडक्ट आणि रेव्हेन्यूची माहिती घेतल्यानंतरच गुंतवणूक करावी. शेअर खरेदी करण्याआधी मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. पेनी स्टॉकमध्ये तितकीच गुंतवणूक करावी जितकं तुमची नुकसान सोसण्याची तयारी आहे. अशा स्टॉकमध्ये अधिक काळासाठी गुंतवणूक करू नये.