Lokmat Money >शेअर बाजार > वर्षभरापूर्वी २७ रुपयांना आलेला IPO, आता पोहोचला २०० रुपयांपार; कंपनी देतेय १७ बोनस शेअर्स

वर्षभरापूर्वी २७ रुपयांना आलेला IPO, आता पोहोचला २०० रुपयांपार; कंपनी देतेय १७ बोनस शेअर्स

एक छोटी कंपनी ओलाटेक सोल्युशन्स (Olatech Solutions) आपल्या गुंतवणूकदारांना मोठी भेट देत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 10:13 AM2023-11-20T10:13:54+5:302023-11-20T10:14:10+5:30

एक छोटी कंपनी ओलाटेक सोल्युशन्स (Olatech Solutions) आपल्या गुंतवणूकदारांना मोठी भेट देत आहे.

A year ago IPO at Rs 27 has now crossed Rs 200 The company is offering 17 bonus shares Olatech Solutions share market | वर्षभरापूर्वी २७ रुपयांना आलेला IPO, आता पोहोचला २०० रुपयांपार; कंपनी देतेय १७ बोनस शेअर्स

वर्षभरापूर्वी २७ रुपयांना आलेला IPO, आता पोहोचला २०० रुपयांपार; कंपनी देतेय १७ बोनस शेअर्स

Olatech Solutions : एक छोटी कंपनी ओलाटेक सोल्युशन्स (Olatech Solutions) आपल्या गुंतवणूकदारांना मोठी भेट देत आहे. कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना 17:20 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजेच कंपनी प्रत्येक 20 शेअर्समागे 17 बोनस शेअर्स देईल. ओलाटेक सोल्युशन्सचे शेअर्स आज एक्स-डेटवर ट्रेडिंग करत आहेत. कंपनीनं बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख 20 नोव्हेंबर 2023 निश्चित केली आहे. कंपनीचा आयपीओ गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आला होता. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिलेत.

27 रुपयांचा होता आयपीओ
ओलाटेक सोल्युशन्सचा (Olatech Solutions) आयपीओ 12 ऑगस्ट 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला होता आणि तो 19 ऑगस्टपर्यंत खुला राहिला. IPO मध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत 27 रुपये होती. 29 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 51.30 रुपयांवर लिस्ट झाले. 17 नोव्हेंबर 2023 रोजी ओलाटेक सोल्युशन्सचे शेअर्स बीएसईवर 239.60 रुपयांवर बंद झाले. इश्यू प्राईजच्या तुलनेत कंपनीचे शेअर्स 789 टक्क्यांनी वाढले आहेत.

6 महिन्यांत 167 टक्क्यांची वाढ
ओलेटेक सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये गेल्या 6 महिन्यांत 167 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स 22 मे 2023 रोजी 90 रुपयांवर होते, जे 17 नोव्हेंबर 2023 रोजी 239.60 रुपयांवर बंद झाले. त्याच वेळी, आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये या वर्षात आतापर्यंत 149 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2 जानेवारी 2023 रोजी वर्षाच्या सुरुवातीला कंपनीचे शेअर्स 96.45 रुपयांवर होते, जे 17 नोव्हेंबर 2023 रोजी 239.60 रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 75 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 239.60 रुपये आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलीये. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: A year ago IPO at Rs 27 has now crossed Rs 200 The company is offering 17 bonus shares Olatech Solutions share market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.