Lokmat Money >शेअर बाजार > हे काय? कंपनीने IPO मध्ये मागितले 78 कोटी, मिळाले 18000 कोटी...

हे काय? कंपनीने IPO मध्ये मागितले 78 कोटी, मिळाले 18000 कोटी...

या IPO ची किंमत 133 ते 140 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 07:04 PM2023-12-13T19:04:18+5:302023-12-13T19:04:28+5:30

या IPO ची किंमत 133 ते 140 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती.

Accent Microcell IPO: Company asked for 78 crores in IPO, got 18000 crores | हे काय? कंपनीने IPO मध्ये मागितले 78 कोटी, मिळाले 18000 कोटी...

हे काय? कंपनीने IPO मध्ये मागितले 78 कोटी, मिळाले 18000 कोटी...

Accent Microcell IPO: गेल्या काही वर्षांत लोकांचा IPO कडे कल झपाट्याने वाढला आहे. एखाद्या कंपनीचा आयपीओ येणार असेल, तर गुंतवणूकदार तयारीत असतात. SME क्षेत्रातील एका आयपीओवर तर गुंतवणूकदार अक्षरशः तुटून पडले. हा IPO विक्रमी 362 वेळा सबस्क्राइब झाला. यामुळेमुळेच शेअर बाजारातून केवळ 78 कोटी रुपये उभारण्यासाठी आलेल्या एक्सेंट मायक्रोसेलच्या  (Accent Microcell IPO) आयपीओत गुंतवणूकदारांनी 18 हजार कोटी रुपये गुंतवले.

Accent Microcell चा IPO 8 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडण्यात आला आणि 12 डिसेंबर रोजी बंद झाला. पहिल्याच दिवशी हा आयपीओ 44.43 वेळा सबस्क्राइब झाला, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 डिसेंबरला 146.39 वेळा आणि तिसऱ्या दिवशी एकूण 362.41 वेळा सबस्क्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांनी एकूण 409.95 पट सबस्क्राइब केला तर पात्र संस्थांनी 118.48 पट आणि बिगर संस्था खरेदीदारांनी 576.70 पट सबस्क्राइब केला. यामुळे Accent Microcell कंपनीला एकूण 763,332 अर्ज प्राप्त झाले आहेत.

हा आयपीओचा प्राइस बँड होता
Accent Microcell IPO चा प्राइस बँड 133 ते 140 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. त्याच्या शेअर्सचे वाटप आज, म्हणजेच बुधवारी केले जाऊ शकते. हा IPO शुक्रवारी, म्हणजेच 15 डिसेंबर रोजी सूचीबद्ध केला जाईल, जो NSE आणि BSE, दोन्ही एक्सचेंजेसवर व्यापार करेल. कंपनीने 78.40 कोटी रुपयांचे 56 लाख शेअर्स विक्रीसाठी आणले होते.

18000 कोटींची बोली
या IPO मध्ये गुंतवणूकदारांनी इतक्या मोठ्या प्रमाणात बोली लावल्या की, हा 362.41 वेळा सबस्क्राइब झाला. अशा स्थितीत या IPO साठी 18 हजार कोटींहून अधिकच्या बोली लागल्या होत्या. मात्र, कंपनी केवळ 78 हजार कोटी रुपयांचे शेअर्स वाटप करणार आहे. उर्वरित पैसे गुंतवणूकदारांच्या खात्यात पाठवले जातील.

एका लॉटसाठी एवढा खर्च 
Accent Microcell च्या IPO मध्ये पैसे गुंतवण्यासाठी तुम्हाला किमान एक लॉट खरेदी करावा लागेल. कंपनीने एका लॉटमध्ये 1000 शेअर्स ठेवले आहेत. याचा अर्थ तुम्हाला किमान 140,000 रुपये खर्च करावे लागतील. 

(नोट- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.) 

Web Title: Accent Microcell IPO: Company asked for 78 crores in IPO, got 18000 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.