Join us  

Adaniनी सहा महिन्यात कमावले, त्याच्या दुप्पट एका दिवसात गमावले; मुकेश अंबानींच्या नेटवर्थमध्येही मोठी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 8:30 AM

Gautam Adani Networth : लोकसभा निवडणुकीत अपेक्षित निकाल न लागल्यानं शेअर बाजार मंगळवारी कोसळला. सेन्सेक्समध्ये चार वर्षांतील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली.

Gautam Adani Networth : लोकसभा निवडणुकीत अपेक्षित निकाल न लागल्यानं शेअर बाजार मंगळवारी कोसळला. सेन्सेक्समध्ये चार वर्षांतील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांचे ३१ लाख कोटी रुपये बुडाले. अदानी समूहाचे (Adani Group) शेअर्स २१ टक्क्यांनी घसरले. त्यामुळे समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत २४.९ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे २०,७९,७२,८९,२५,००० रुपयांची घट झाली. ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार अदानी यांची नेटवर्थ आता ९७.५ अब्ज डॉलर्स झाली आहे. यासह ते जगातील श्रीमंतांच्या यादीत १५ व्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यांच्या संपत्तीत या वर्षी १३.२ अब्ज डॉलर्सची वाढ झाली होती. आशियातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यानंतर ते दुसऱ्या क्रमांकावर आलेत. 

अदानी समूहाच्या शेअर्सपैकी सर्वाधिक घसरण अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये (APSEZ) झाली. हे शेअर्स २१.२६ टक्क्यांनी घसरले. अदानी एनर्जी सोल्यूशन २० टक्के, अदानी एंटरप्रायजेस १९.३५ टक्के, अदानी ग्रीन एनर्जी १९.२० टक्के, अदानी टोटल गॅस १८.८८ टक्के, अदानी पॉवर १७.२७ टक्के आणि अदानी विल्मर ९.९८ टक्क्यांनी घसरले. त्याचप्रमाणे एनडीटीव्ही १८.५२ टक्के, एसीसी १४.७१ टक्के आणि अंबुजा सिमेंट्स १६.८८ टक्क्यांनी घसरले.  

मुकेश अंबानी यांना मागे टाकत अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. परंतु त्यांचा हा क्रमांक काही दिवसच टिकला. मात्र, मंगळवारी अंबानी यांच्या संपत्तीतही ८.९९ अब्ज डॉलर म्हणजेच ७,५०,७८,५९,१५,५०० रुपयांची घट झाली. मंगळवारी त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर ७.५३ टक्क्यांनी घसरला.

टॅग्स :गौतम अदानीमुकेश अंबानीशेअर बाजार