Join us  

अदानींच्या झोळीत आली 'ही' विदेशी कंपनी, एक्सपर्ट बुलिश; म्हणाले, "₹३८०० वर जाणार शेअर"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 8:24 AM

गौतम अदानी समूहाची कंपनी अदानी एन्टरप्रायझेसच्या झोळीत एक मोठी कंपनी आली आहे.

Adani Enterprises share: गौतम अदानी समूहाची कंपनी अदानी एन्टरप्रायझेसच्या झोळीत एक मोठी फ्रेन्च कंपनी आली आहे. त्यांच्या दुबईस्थित कंपनी ऑस्प्रे इंटरनॅशनल एफझेडसीओनं फ्रान्सच्या Le Marche ड्यूटी फ्री SAS (LMDF) मध्ये ५,००० युरोमध्ये १०० टक्के हिस्सा विकत घेतला असल्याची माहिती अदानी एन्टरप्रायझेसनं दिली. फ्रान्समध्ये गेल्या महिन्यातच LMDF अस्तित्वात आले. फ्रान्समध्ये ड्युटी फ्री व्यवसाय चालवण्याच्या उद्देशानं कंपनी सुरू करण्यात आली होती. परंतु कंपनीनं अद्याप काम सुरू केलेलं नाही. 

फ्लेमिंगो ग्रुपचे प्रमोटर अतुल आहुजा हे LMDF चे मालक आहेत. एलएमडीएफचे ५००० शेअर्स विकत घेतले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रत्येकाची फेस व्हॅल्यू एक युरो आहे. आहुजा हे याचे एकमेव भागधारक आहेत. अदानी एन्टरप्रायझेसची उपकंपनी असलेल्या मुंबई ट्रॅव्हल रिटेल प्रायव्हेट लिमिटेडच्या (एमटीआरपीएल) हितासाठी हे संपादन रणनितीक स्वरूपाचं आहे, असं एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटलं. 

शेअर्सची स्थिती काय? 

आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी मंगळवारी, अदानी समूहाची आघाडीची कंपनी अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. बीएसईवर शेअर्स यापूर्वीच्या बंदच्या तुलनेत २.२८ टक्क्यांनी घसरुन ३,२३३.४० रुपयांवर पोहोचले. या शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश आहेत. अलीकडेच, व्हेंचुरा सिक्युरिटीजनं पुढील सहा महिन्यांसाठी टार्गेट प्राईज दिली होती. ब्रोकरेजचे रिसर्च हेड विनीत बोळींजकर यांनी सांगितलं की, पुढील सहा महिन्यांत स्टॉक ३,७००-३,८०० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हा शेअर ४ मार्च २०२४ रोजी ३३४९.३५ रुपयांवर पोहोचला. हा शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तीक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गौतम अदानीअदानी