Lokmat Money >शेअर बाजार > तोट्यातून फायद्यात आली अदानींची 'ही' मोठी कंपनी, जबरदस्त कमबॅक; शेअर बनला 'रॉकेट'!

तोट्यातून फायद्यात आली अदानींची 'ही' मोठी कंपनी, जबरदस्त कमबॅक; शेअर बनला 'रॉकेट'!

अदानी इंटरप्रायजेस लिमिटेडनं मंगळवारी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचा अहवाल जारी केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 03:29 PM2023-02-14T15:29:54+5:302023-02-14T15:30:15+5:30

अदानी इंटरप्रायजेस लिमिटेडनं मंगळवारी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचा अहवाल जारी केला आहे.

adani enterprises q3 results firm posts net profit of 820 crore against loss yoy revenue up 42 percent | तोट्यातून फायद्यात आली अदानींची 'ही' मोठी कंपनी, जबरदस्त कमबॅक; शेअर बनला 'रॉकेट'!

तोट्यातून फायद्यात आली अदानींची 'ही' मोठी कंपनी, जबरदस्त कमबॅक; शेअर बनला 'रॉकेट'!

नवी दिल्ली-

अदानी इंटरप्रायजेस लिमिटेडनं मंगळवारी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचा अहवाल जारी केला आहे. या काळात कंपनीचा कंसोलिडेटेड नेट प्रॉफिट ८२० कोटी रुपये इतका राहिला आहे. कंपनीनं डिसेंबरच्या तिमाहीत जबरदस्त कामगिरीची नोंद केली आहे. गेल्या वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत अदानी इंटरप्रायजेसला ११.६३ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. पण यावेळी डिसेंबर महिन्याच्या तिमाहीत अदानी इंटरप्रायजेसनं जबरदस्त नफा कमावला आहे. 

शेअरमध्ये तेजी
तिमाहीचा अहवाल समोर येताच अदानी एंटरप्रायजेसच्या शेअरमध्येही तुफान तेजी पाहायला मिळत आहे. हिंडनबर्गच्या अहवालानंतर एकाच दिवसात अदानी इंटरप्रायजेसचे शेअर्स ३५ टक्क्यांहून अधिक कोसळले होते. आजची परिस्थिती पाहिली तर अदानी एंटरप्रायजेसचे शेअर ४ टक्क्यांनी वाढले आहेत. 

कंपनीच्या नफ्यात सुधारणा
डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीची कंसोलिडेटेड मिळकत वार्षिक आधारावर वाढून २६,६१२ कोटी रुपये राहिली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीशी तुलना केली असता कंपनीची मिळकत १८,७५८ कोटी रुपये इतकी होती. डिसेंबरच्या तिमाहीत अदानी एंटरप्रायजेसच्या नफ्याच्या टक्केवारीतही सुधार पाहायला मिळाला आहे. वार्षिक पातळीवरील नफ्याचं ४.१ टक्क्याचं प्रमाण आता ६.१ टक्क्यांवर पोहोचलं आहे. 

डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचा खर्च देखील वाढला आहे. यावेळीच्या तिमाहीत २६,१७१ कोटी खर्च झाले आहेत. तर गेल्या वर्षी डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचे १९,०४७.७ कोटी रुपये खर्च झाले होते. 

FPO घेतला होता माघारी
२७ जानेवारी २०२३ रोजी अदानी ग्रूपनं आपली फ्लॅगशीप कंपनी अदानी इंटरप्रायजेसचा २० हजार कोटी रुपयांचा FPO पूर्णपणे सब्सक्राइब होऊनही परत घेण्याची घोषणा केली होती. अदानी ग्रूपचे चेअरमन गौतम अदानी यांनी देशातील सर्वात मोठा एफपीओ परत घेत असल्याची माहिती दिली होती. शेअरमधील घसरण यामागचं कारण देण्यात आलं होतं. 

Web Title: adani enterprises q3 results firm posts net profit of 820 crore against loss yoy revenue up 42 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Adaniअदानी