Lokmat Money >शेअर बाजार > अदानी ग्रुपने सुरू केला आणखी एक सोलर प्लांट, कंपनीच्या शेअर्सने पकडला वेग...

अदानी ग्रुपने सुरू केला आणखी एक सोलर प्लांट, कंपनीच्या शेअर्सने पकडला वेग...

Adani Green Energy: अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर आज 1893.90 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहचले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 04:52 PM2024-03-27T16:52:01+5:302024-03-27T16:52:43+5:30

Adani Green Energy: अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर आज 1893.90 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहचले.

Adani Green Energy: Adani Group launches another solar plant, shares of the company gain momentum | अदानी ग्रुपने सुरू केला आणखी एक सोलर प्लांट, कंपनीच्या शेअर्सने पकडला वेग...

अदानी ग्रुपने सुरू केला आणखी एक सोलर प्लांट, कंपनीच्या शेअर्सने पकडला वेग...

Adani Green Energy: बुधवारचा दिवस गौतम अदानींसाठी चांगला ठरला. बुधवारी अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये 2% वाढ झाली. या वाढीमुळे अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर्स 1893.90 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. शेअर्समध्ये ही वाढ एका बातमीनंतर झाली आहे. बातमी अशी की, अदानी ग्रीन एनर्जी देवीकोट, जैसलमेर, राजस्थान येथे 180 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करणार आहे.

कंपनीने काय म्हटले?
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील सर्वात मोठी सोलर एनर्जी कंपनी, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) चा 25 वर्षांचा वीज खरेदी करार (PPA) झाला आहे. या प्लांटच्या यशस्वीपणे कार्यान्वित झाल्यामुळे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे ऑपरेशनल सोलर व्हॉल्यूम 6,243 MW पर्यंत वाढले आहे. एकूण कार्यान्वित निर्मिती क्षमता 9,784 मेगावॅटवर पोहोचली असून, ही भारतातील सर्वोच्च आहे.

राजस्थानमधील 180 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प दरवर्षी सुमारे 54 कोटी वीज युनिट तयार करेल. यामुळे 1.1 लाखाहून अधिक घरांना उर्जा मिळेल, तसेच सुमारे 3.9 लाख टन CO2 उत्सर्जन कमी होईल. 

कंपनीचे शेअर्स
अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर्स 1893.90 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. शेअरची 52 आठवड्यांची उच्च किंमत 2,016 रुपये आहे तर 52 आठवड्यांची सर्वात कमी किंमत 796 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 2,95,928.95 कोटी रुपये आहे. गेल्या सहा महिन्यांत हा स्टॉक 85% वर चढला आहे. या शेअरचा कमाल परतावा 6000% पेक्षा जास्त आहे. 2018 मध्ये या शेअरची किंमत 30 रुपये होती.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Adani Green Energy: Adani Group launches another solar plant, shares of the company gain momentum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.