Lokmat Money >शेअर बाजार > Adani Green Energy Share: आरोपांनंतरही अदानींचा 'हा' शेअर सुस्साट; ४ दिवसांत ६०% वाढला स्टॉक; आजही मोठी तेजी

Adani Green Energy Share: आरोपांनंतरही अदानींचा 'हा' शेअर सुस्साट; ४ दिवसांत ६०% वाढला स्टॉक; आजही मोठी तेजी

Adani Green Energy Share: अदानी समूहाचा शेअर सोमवारी सकाळी बीएसईवर ९.०९ टक्क्यांनी वधारून १,४४५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 12:29 PM2024-12-02T12:29:23+5:302024-12-02T12:29:23+5:30

Adani Green Energy Share: अदानी समूहाचा शेअर सोमवारी सकाळी बीएसईवर ९.०९ टक्क्यांनी वधारून १,४४५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

Adani Green Energy Share buoyant despite allegations Stock up 60 percent in 4 days Big boom even today | Adani Green Energy Share: आरोपांनंतरही अदानींचा 'हा' शेअर सुस्साट; ४ दिवसांत ६०% वाढला स्टॉक; आजही मोठी तेजी

Adani Green Energy Share: आरोपांनंतरही अदानींचा 'हा' शेअर सुस्साट; ४ दिवसांत ६०% वाढला स्टॉक; आजही मोठी तेजी

Adani Green Energy Share: गेल्या चार दिवसांत अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या (Adani Green Energy Ltd) शेअरमध्ये ६०.६६ टक्क्यांची वाढ झाली आहे. सोमवारी कंपनीच्या शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजी दिसून आली. अदानी समूहाचा शेअर सोमवारी सकाळी बीएसईवर ९.०९ टक्क्यांनी वधारून १,४४५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. यापूर्वी अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप झाले होते. ज्यानंतर ग्रुपच्या लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप खूप घसरलं होतं.

ही बातमी ठरली कारण

अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स वाढण्यामागचं खरं कारण म्हणजे अदानी समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगेशिंदर सिंग यांनी शेअर केलेली नवी माहिती. समूह डॉलर बॉन्डचा फेरविचार करेल. पुढील वर्षी एप्रिल ते जून दरम्यान येऊ शकते. समूहातील इतर कंपन्याही वर्षभरात पब्लिक बॉन्ड विकण्याचा विचार करू शकतात, असं त्यांनी सांगितलं. अमेरिकी अधिकाऱ्यांनी लाचखोरीचा आरोप केल्यानंतर अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडनं आपली ६०० मिलियन डॉलर्सची बॉन्ड योजना मागे घेतली होती. दरम्यान, अदानी समूहानं हे सर्व आरोप तथ्यहिन असल्याचं म्हणत त्याचं खंडन केलं होतं.

अलीकडच्या कायदेशीर बाबींनंतरही क्रिसिलनं अदानी समूहाच्या कंपन्यांसाठी आपल्या मजबूत रेटिंगमध्ये बदल केलेला नाही. ब्रोकरेज हाऊसच्या म्हणण्यानुसारअदानी समूहाकडे पुरेशी तरलता आणि ऑपरेशनल कॅश फ्लो आहे, ज्यामुळे मध्यम कालावधीत कंपनीच्या कर्जाच्या परतफेडीवर परिणाम होणार नाही.

शेअर्सवर परिणाम

हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यापासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतींवर परिणाम झाला होता. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. या शेअरची किंमत ६ महिन्यांत ३०.७० टक्क्यांनी घसरली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Adani Green Energy Share buoyant despite allegations Stock up 60 percent in 4 days Big boom even today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.