Join us  

अदानींच्या कंपनीला ₹372 कोटींचा बंपर नफा, शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 6:18 PM

अदानी ग्रीन एनर्जीचे या तिमाहीतील इतर उत्पन्न 369 कोटी रुपये एवढे होते.

अदानी समूहाच्या अदानी ग्रीन एनर्जीने सप्टेंबर 2023 ला संपलेल्या तिमाहीचे निकाल जारी केले आहेत. या तिमाहीत कंपनीला जबरदस्त नफा मिळाला आहे. वार्षिक आधारावर कंपनीचा नफा 2.5 पट वाढून 372 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याच पद्धतीने, ऑपरेशन्समधील वार्षिक महसूल 40% नी वाढून 2,220 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचे इतर उत्पन्न 369 कोटी रुपये -अदानी ग्रीन एनर्जीचे या तिमाहीतील इतर उत्पन्न 369 कोटी रुपये एवढे होते. तर एक वर्षापूर्वी हे 100 कोटी रुपये एवढे होते. कंपनीच्या इतर उत्पन्नात एसबी एनर्जीच्या भूमी होल्डिंगचाही समावेश आहे. कंपनीने 122 कोटी रुपयांच्या अशा कमाईला "इतर उत्पन्नात" ठेवण्यात आले आहे.

शेअरमध्ये तेजी -यातच, अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर आज अर्थात सोमवारीच्या व्यवहारात बीएसईवर 4.95% अथवा 43.15 रुपयांनी वाढून 914.65 रुपयांवर बंद झाला. ट्रेडिंगदरम्यान अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 939.80 रुपयांपर्यंत पोहोचला होता. कंपनीचे मार्केट कॅप 1,44,883.53 कोटी रुपये एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :अदानीगौतम अदानीशेअर बाजारगुंतवणूक