Join us  

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान अदानींच्या शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड, ₹१५००० कोटींचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 12:14 PM

अदानी समूहाचं बाजार भांडवल अंदाजे 15,000 कोटींनी वाढलं.

Adani group stocks: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स वाढले. यामुळे अदानी समूहाचं बाजार भांडवल अंदाजे 15,000 कोटींनी वाढलं. अदानी समूहाविरुद्धच्या फसवणुकीच्या आरोपांची चौकशी करण्याची विनंती करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी झाली आणि आपला निर्णय राखून ठेवला आहे.शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, समूहाच्या 10 पैकी नऊ लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले. यासह शुक्रवारी समूहाच्या बाजार भांडवलात 14,786 कोटी रुपयांची वाढ झाली. अदानी समूहाच्या 10 कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल शुक्रवारी व्यवहाराच्या शेवटी सुमारे 10.26 लाख कोटी रुपये होते. एक दिवस आधी हा आकडा 10.11 लाख कोटी रुपये होता.कोणत्या कंपनीची काय स्थिती?ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 2.58 टक्क्यांनी वाढले आणि त्यांचे बाजार भांडवल 2.53 लाख कोटी रुपये झाले. याशिवाय अदानी पॉवर 4.06 टक्के, अदानी टोटल गॅस 1.2 टक्के, अदानी एनर्जी सोल्युशन्स 0.84 टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 0.77 टक्क्यांनी वधारले. अदानी समूहातील फक्त अंबुजा सिमेंटच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली आणि कंपनीचे शेअर्स 0.31 टक्क्यांनी घसरले.सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं?हिंडेनबर्ग अहवालातील अदानी समूहाविरोधातील आरोपांची चौकशी करणाऱ्या बाजार नियामक सेबीवर संशय घेण्याचं कारण नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. बाजार नियामकाच्या तपासावर विश्वास न ठेवण्यासारखं कोणतंही तथ्य आपल्या समोर नाही, असंही त्यांनी नमूद केलं. यासोबतच, सर्वोच्च न्यायालयानं सांगितले की, हिंडेनबर्ग अहवालातील दावे पूर्णपणे तथ्यांवर आधारित नसल्याचा विचार करत आहोत. खंडपीठाने सांगितलं की, त्यांच्यासमोर कोणतेही तथ्य नसताना, आपल्या स्तरावर विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करणं योग्य होणार नाही. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाशी संबंधित पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला.

टॅग्स :गौतम अदानीसर्वोच्च न्यायालय