Adani Group Loss : हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये सातत्याने घसरण होत आहे. सोमवारीही अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. अदानींच्या १० पैकी सहा कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या लोअर सर्किट लिमिटमध्ये दिसत आहेत. त्यामुळे अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये ५० हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
अदानीच नाही तर बाबा रामदेवांच्या कंपनीलाही 10 दिवसांत 7000 कोटींचा फटका, जाणून घ्या काय आहे कारण?
अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांची घसरण झाली असून कंपनीचा शेअर १,२६१.४० रुपयांपर्यंत खाली आला आहे. अदानी यांची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर ७.५ टक्क्यांनी घसरून १,४६५ रुपयांवर आला आहे. अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर ५ टक्के आणि एनडीटीव्ही समभाग ४.९८ टक्क्यांनी घसरत आहेत.
५० हजार कोटी रुपयांचे नुकसान
सोमवारी शेअर्सच्या घसरणीमुळे १० कंपन्यांच्या अदानी समूहाचे मार्केट कॅप काही तासांच्या व्यवहारात ५०,००० कोटी रुपयांहून अधिक घसरले आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांचे एकत्रित मार्केट कॅप ९.५८ लाख कोटी रुपयांवर घसरले. गेल्या आठ ट्रेडिंग सत्रांमध्ये एकूण तोटा १० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.
एफपीओ घ्यावा लागला परत
बाजारातील घसरणीमुळे अदानी एंटरप्रायझेसला इंटरनॅशनल बॉन्ड आणि २०,००० कोटी रुपयांच्या FPO द्वारे सुमारे ५०० दशलक्ष डॉलर उभारण्याची योजना रद्द करावी लागली. अदानी एफपीओ हा देशातील सर्वात मोठा एफपीओ होता, जो पूर्ण सबस्क्राइब देखील झाला होता, परंतु अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये सतत घसरण झाल्यामुळे गौतम अदानी यांना तो मागे घ्यावा लागला आहे.