WIPL Franchises : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) बुधवारी महिला प्रीमिअर लीग ( Women's Premier League) च्या पाच फ्रँचायझींची नावे जाहीर केली. इंडियन प्रीमिअर लीगच्या शर्यतीत फ्रँचायझी खरेदीमध्ये आशियातील सर्वात श्रीमंत अदानी समुहाला अपयश आले होते. पण, त्यांनी महिला प्रीमिअर लीगमधील अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी करण्यात कोणतीच कसर सोडली नाही. सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून त्यांनी अहमदाबाद फ्रँचायझीचे मालकी हक्क खरेदी केले, परंतु शेअर बाजारात त्यांना ४६ हजार कोटींचा फटका बसल्याचे वृत्त येऊन धडकले आहे.
ट्विस्ट! महिला आयपीएल नव्हे, तर जय शाह यांच्याकडून 'नामकरण'; जाणून घ्या नवं नाव
महिला आयपीएलसाठी बीसीसीआयने मागवलेल्या प्रसारण हक्कासाठीच्या बोलीत वायकॉम १८ ने डिझनी स्टार आणि सोनीला मागे टाकून पाच वर्षांसाठी ९५१ कोटींची सर्वाधिक बोली लावली. महिला क्रिकेटसाठी ही खूप मोठी झेप मानली जात आहे. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. राजस्थान रॉयल्सने सर्वात कमी १८० कोटींची बोली लावली. हल्दीरामने २४० कोटीं आणि कोलकाताने ६६६ कोटींची बोली लावली.
𝐁𝐂𝐂𝐈 𝐚𝐧𝐧𝐨𝐮𝐧𝐜𝐞𝐬 𝐭𝐡𝐞 𝐬𝐮𝐜𝐜𝐞𝐬𝐬𝐟𝐮𝐥 𝐛𝐢𝐝𝐝𝐞𝐫𝐬 𝐟𝐨𝐫 𝐖𝐨𝐦𝐞𝐧’𝐬 𝐏𝐫𝐞𝐦𝐢𝐞𝐫 𝐋𝐞𝐚𝐠𝐮𝐞.
— BCCI (@BCCI) January 25, 2023
The combined bid valuation is INR 4669.99 Cr
A look at the Five franchises with ownership rights for #WPLpic.twitter.com/ryF7W1BvHH
संघ खरेदीपूर्वी अदानी समूहाला शेअर बाजारात मोठा धक्का बसला. अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स १.५% आणि ९% च्या दरम्यान घसरले. हिंडनबर्ग, एका सुप्रसिद्ध यूएस शॉर्ट-सेलरने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे आणि ज्यात असे म्हटले आहे की अदानी कंपन्यांनी कर्जासाठी त्यांच्या फुगलेल्या स्टॉकचे शेअर्स गहाण ठेवण्यासह बऱ्यापैकी कर्ज घेतले आहे. या अहवालात असा दावा दावा केला आहे की भारतीय कंपनीने अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फसवणूक योजनेत भाग घेतला होता. दुसरीकडे अदानी समूहाने असा दावा केला आहे की या अहवालात चुकीचा आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"