Join us  

आर्थिक वर्षात Adani Groupला बंपर नफा; ब्रोकरेज 'या' तीन स्टॉक्सवर बुलिश, किती दिली टार्गेट प्राईज?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 2:35 PM

Adani Group Profit : गेल्या वर्षी हिंडेनबर्ग संकटामुळे अदानी समूहाच्या प्रतिष्ठेला तडा गेला होता, पण त्यानंतर या समूहानं दमदार पुनरागमन केलं.

Adani Group Profit : अदानी समूहाचे शेअर्स चर्चेत असून लोकसभा निवडणुकीचे निकाल गुंतवणूकदारांच्या अपेक्षेप्रमाणे आले आणि निवडणूक निकालात भाजपला अपेक्षित जागा मिळाल्या तर शेअर बाजारात मोठी तेजी येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहेत. या बाजारातील या संभाव्य तेजीमध्ये अदानी समूहाचे शेअर्सही चमकू शकतात. 

गेल्या वर्षी हिंडेनबर्ग संकटामुळे अदानी समूहाच्या प्रतिष्ठेला तडा गेला होता, पण त्यानंतर या समूहानं दमदार पुनरागमन केलं. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये अदानी समूहाचा टॅक्सनंतरचा नफा ५५ टक्क्यांनी वाढून ३०,७६८ कोटी रुपये झाला आहे. 

ब्रोकरेजनं काय म्हटलंय? 

जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने कमाईच्या आकडेवारीचे विश्लेषण केलंय. या विश्लेषणाच्या टप्प्यानंतर जेफरीजनं अदानीच्या ३ शेअर्सवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अदानी समूहाचा एबिटडा आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ४० टक्क्यांनी वाढून ६६० अब्ज रुपये झाला. कारण वाढलेली क्षमता, हाय व्हॉल्यूम, मर्चंट कॉन्ट्रिब्युशन आणि कमी आयात केलेल्या कोळशाच्या किंमतींमुळे कोळशाच्या किंमतीनुसार अदानी पॉवरच्या एबिटडा दुपटीपेक्षा अधिक झालाय. विल्मर वगळता समूहातील इतर कंपन्यांसाठी एबिटडाची वाढ १६ ते ३३ टक्क्यांच्या दरम्यान होती. 

'हा' शेअर खरेदी करण्याचा सल्ला 

जेफरीजने अदानी एंटरप्रायझेस (टार्गेट प्राइस ३,८०० रुपये), अदानी पोर्ट्स (टार्गेट प्राइस १,६४० रुपये) आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स (टार्गेट प्राइस १,३६५ रुपये) यांच्यावर खरेदीचा शिफारस केली आहे. 'अदानी पोर्ट्सची कामकाजाच्या बाबतीत जोरदार वाढ होत आहे. आर्थिक वर्ष २०१५ मध्ये कंपनीचा बाजारातील हिस्सा १४ टक्क्यांवरून आता २७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे आणि आर्थिक वर्ष २०२६-२७ पर्यंत ३० टक्क्यांपेक्षा अधिक होण्याची अपेक्षा आहे,' असं जेफरीजनं म्हटलंय. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गौतम अदानीव्यवसाय