Join us  

Adani Group Share: आधी दिला मोठा नफा, आता नुकसान; अदानींच्या कंपन्यांनी वाढवली गुंतवणूकदारांची डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 1:32 PM

Adani Group Share :अदानींच्या संपत्तीतही मोठी घट.

Adani Group Share: गेल्या आठवडाभरापासून अदानी समूहातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात तोटा सोसावा लागत आहे. अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये 13 टक्‍क्‍यांहून अधिक तर अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. याशिवाय अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन, अदानी पोर्ट्स, अदानी गॅस या कंपन्यांच्या शेअर्सचीही स्थिती चांगली नाही.

आजही सुरुवातीच्या व्यवहारात अदानी टोटल गॅस 1.10 टक्क्यांनी घसरून 3011 रुपयांवर व्यवहार करत होता. तर, अदानी पोर्ट्स 783 रुपयांवर व्यवहार करत होता. तर अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये 1.43 टक्क्यांनी घसरण होऊन ते 645.50 रुपयांवर पोहोचले होते. अदानी पॉवरमध्ये सर्वाधिक ३.०९ टक्के घसरण झाल्याचे दिसून आले.

अदानी समूहाच्या समभागांच्या घसरणीमुळे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीवरही परिणाम झाला आहे. त्यांची एकूण संपत्ती 123 अब्ज डॉलरवर आली आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीत अदानी अजूनही चौथ्या क्रमांकावर आहेत. या वर्षी शेअर्सच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे, दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत त्यांची संपत्ती 8.9 बिलियन डॉलर्सवरून 121 बिलियन डॉलर्स इतकी झाली.

टॅग्स :गौतम अदानीशेअर बाजार