सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनेलचा (SC panel) रिपोर्ट समोर आल्यानंतर सोमवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये बंपर वाढ दिसून झाली. सोमवारी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये जवळपास 19 टक्क्यांनी वाढ झाली. यानंतर मंगळवारी अदानी समूहाबाबत आणखी एक चांगली बातमी समोर आली. राजीव जैन यांच्या जीक्युजी पार्टनर्स (GQG Partners) या इन्व्हेस्टमेंट फर्मनं अदानी समूहातील आपला हिस्सा 10 टक्क्यांनी वाढवला आहे. त्यामुळे मंगळवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली.
अदानी एन्टरप्राईजेस
अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये मंगळवारीही मोठी वाढ झाली. बीएसईवर कंपनीचा शेअर 13.19 टक्क्यांनी किंवा 306.70 रुपयांनी वाढून 2632.25 रुपयांवर पोहोचला. यासह कंपनीचे मार्केट कॅप 3,00,076.80 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
अदानी पोर्ट
मंगळवारी अदानी पोर्ट्सचे शेअर्स 0.53 टक्क्यांनी किंवा 3.90 रुपयांनी 733.55 रुपयांवर बंद झाले. यासह, कंपनीचे मार्केट कॅप 1,58,456.99 कोटी रुपयांवर पोहोचले.
अदानी पॉवरमध्ये अप्पर सर्किट
अदानी पॉवरच्या शेअरमध्ये मंगळवारी अपर सर्किट लागलं. शेअर 5 टक्क्यांनी किंवा 12.40 रुपयांनी 260.40 रुपयांवर बंद झाला.
अदानी ट्रान्समिशनमध्ये अप्पर सर्किट
अदानी ट्रान्समिशनच्या शेअरलादेखील मंगळवारी अपर सर्किट लागलं. कंपनीचा शेअर 5 टक्क्यांनी वाढून 41.25 रुपये 866.60 वर पोहोचला. यासह कंपनीचे मार्केट कॅप 96,668.60 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
अदानी ग्रीन
अदानी ग्रीनच्या शेअरलाही मंगळवारी अपर सर्किट लागले. मंगळवारी शेअर 5 टक्क्यांनी वाढून 989.50 रुपयांवर बंद झाला. यासह कंपनीचे मार्केट कॅप 1,56,740.01 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
अदानी ग्रीन आणि अदानी टोटलमध्येही अपर सर्किट
अदानी ग्रीनच्या शेअरलाही अपर सर्किट लागलं. मंगळवारी कंपनीचा शेअर 5 टक्क्यांनी वाढून 989.50 रुपयांवर बंद झाला. यासह कंपनीचे मार्केट कॅप 1,56,740.01 कोटी रुपयांवर पोहोचले. तर दुसरीकडे अदानी टोटलच्या शेअरलाही अपर सर्किट लागलं. कंपनीचा शेअर 5 टक्क्यांनी वाढून 757.40 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप 83,299.62 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
तर अदानी विल्मरच्या शेअरमध्येही अपर सर्किट लागलं असून शेअर 488.80 रुपयांवर बंद झाले. दुसरीकडे एनडीटीव्हीच्या शेअर्समध्येही अपर सर्किट लागलं. तर एसीसीच्या शेअर्समध्ये 0.25 टक्क्यांची आणि अंबुजा सीमेंटच्या शेअर्समध्येही 0.90 टक्क्यांची वाढ झाली.