Lokmat Money >शेअर बाजार > अदानी समूहातील 'या' कंपनीचा धमाका; दोन दिवसांत 21,545 कोटींची कमाई

अदानी समूहातील 'या' कंपनीचा धमाका; दोन दिवसांत 21,545 कोटींची कमाई

अदानी समूहातील याच कंपनीला हिंडनबर्ग रिपोर्टमुळे सर्वाधिक फटका बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 09:59 PM2023-11-29T21:59:10+5:302023-11-29T21:59:54+5:30

अदानी समूहातील याच कंपनीला हिंडनबर्ग रिपोर्टमुळे सर्वाधिक फटका बसला.

Adani Group's 'adani total gas' Company high on share market; earned 21,545 crore in two days | अदानी समूहातील 'या' कंपनीचा धमाका; दोन दिवसांत 21,545 कोटींची कमाई

अदानी समूहातील 'या' कंपनीचा धमाका; दोन दिवसांत 21,545 कोटींची कमाई

Adani Group: गौतम अदानींच्या नेतृत्वातील अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये बुधवारी घसरण दिसून आली. ही घसरण फारशी नव्हती, पण समूहातील एका कंपनीने जबरदस्त कमाई केली. कंपनीच्या शेअरमध्ये बाजार बंद होईपर्यंत 13 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. कंपनीने दोन दिवसांत 36 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली. या दोन दिवसांत कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 21,500 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

ही कंपनी अदानी टोटल गॅस आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 80,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये 36.49 टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीचा शेअर सोमवारी 536.80 रुपयांवर होता, तो वाढून 732.70 रुपयांवर पोहोचला आहे. मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर आज कंपनीचे शेअर 13.75 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तज्ञांच्या मते, कंपनीच्या शेअर्समध्ये येत्या काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

24 जानेवारीपासून अजूनही 81% मागे 
कंपनीचा स्टॉक हिंडेनबर्ग अहवालापूर्वीच्या पातळीपेक्षा 81 टक्के कमी आहे. 24 जानेवारी रोजी कंपनीचा शेअर 3,885.45 रुपयांवर होता. जो अद्याप 800 रुपयांपर्यंतही पोहोचलेले नाही. हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टनंतर अदानी समूहाच्या या कंपनीला सर्वाधिक फटका बसला आहे. विशेष म्हणजे, अदानी पोर्टच्या शेअर्सनी 24 जानेवारीची पातळी ओलांडली आहे.

दोन दिवसांत 21500 कोटींचा नफा
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या या वाढीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली आहे. अदानी टोटल गॅसचे मार्केट कॅप 80,583.08 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सोमवारी बाजार बंद झाला, तेव्हा मार्केट कॅप 59,037.80 कोटी रुपये होते. याचा अर्थ कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 21,545.28 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 24 जानेवारी 2023 रोजी कंपनीचे मार्केट कॅप 4,27,325.68 कोटी रुपये होते. तिथे पोहोचायला खूप वेळ लागू शकतो.

Web Title: Adani Group's 'adani total gas' Company high on share market; earned 21,545 crore in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.