Join us  

Adani समूहातील तेजीचा 'या' दिग्गज गुंतवणूकदाराला फायदा; कमावले १७ हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 3:07 PM

हिंडेनबर्गच्या आरोपांनंतर कठीण काळात गौतम अदानींसाठी संकटमोचक ठरलेल्या गुंतवणूकदाराला अदानी समुहाच्या कंपन्यांच्या शेअरमधील तेजीचा मोठा फायदा झालाय. दिग्गज गुंतवणूकदार ...

हिंडेनबर्गच्या आरोपांनंतर कठीण काळात गौतम अदानींसाठी संकटमोचक ठरलेल्या गुंतवणूकदाराला अदानी समुहाच्या कंपन्यांच्या शेअरमधील तेजीचा मोठा फायदा झालाय. दिग्गज गुंतवणूकदार राजीव जैन यांनी या कालावधीत मोठा नफा कमावला. त्यांना या कालावधीत तब्बल १७ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला. त्यांना आपल्या गुंतवणुकीवर तब्बल ८२ टक्क्यांचे रिटर्न मिळालेत.

राजीव जैन है जीक्युजी पार्टनर्स इंकचे संस्थापक आहे. ते फोर्ट लॉडरेल स्थित कंपनीचे चेअरमन आणि चीफ इनव्हेस्टमेंट ऑफिसरही आहेत. त्यांनी २०१६ मध्ये आपल्या कंपनीची स्थापना केली होती आणि २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या शेअर बाजारात कंपनी लिस्ट केली होती.

कोणत्या कंपनीत गुंतवणूक?प्राईम डेटाबेसच्या आकडेवारीनुसार ६ डिसेंबरच्या क्लोझिंग प्राईजनुसार जीक्युजी पार्टनर्सची अदानी समुहातील गुंतवणूक वाढून ३९,३३१ कोटी रुपयांवर पोहोचली. २१६६० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या हिशोबानं राजीव जैन यांना ८२ टक्क्यांचा नफा झाला. त्यांनी अदानी एन्टरप्राईजेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स आणि अदानी पॉवरमध्ये गुंतवणूक केली आहे. याशिवाय जीक्युजी पार्टनर्सची अंबुजा सीमेंटमध्येही गुंतवणूक आहे. त्यांनी १५२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून त्याचं मूल्य आता १७९३ कोटी रुपयांवर गेलंय.म्हणून शेअर्समध्ये तेजीअदानी समूहावर हिंडेनबर्गनं केलेले आरोप तथ्यहिन असल्याचा अहवाल समोर आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा समूहाच्या शेअर्सनं वेग पकडला. अमेरिकन सरकारच्या संस्थेनं अदानी समूहाला क्लीन चिट दिली आणि हिंडेनबर्गचे आरोप निरर्थक असल्याचं म्हटले. हा अहवाल आल्यानंतरच अदानींच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. २४ जानेवारी रोजी अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गनं अदानी समूहावर केलेल्या आरोपांनंतर, समूहाने आता जबरदस्त पुनरागमन केलंय.

टॅग्स :अदानीगौतम अदानी