Join us  

Adani Power: काय चाललेय? अदानींच्या या कंपनीचा ९६ टक्के नफा घटला, तरी शेअरला अप्पर सर्किट...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 7:31 PM

अदानी पावरने तिसऱ्या तिमाहीतील निकाल जाहीर केला आहे. या तिमाहीतील निव्वळ नफा हा तब्बल ९६ टक्क्यांनी घसरला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अदानी समुहाचे वाईट दिवस सुरु झाले होते. आज पुन्हा अदानींचा भाव वाढला आणि गटांगळ्या खाणारे शेअर्स वाढले. एका रिपोर्टने अदानींच्या साम्राज्याला मोठा हादरा दिला होता. यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी हे पहिल्या २० अब्जाधीशांच्या यादीतूनही हद्दपार झाले होते. अशातच अदानींची एक कंपनी आश्चर्याचा धक्का देत आहे. 

अदानी पावरने तिसऱ्या तिमाहीतील निकाल जाहीर केला आहे. या तिमाहीतील निव्वळ नफा हा तब्बल ९६ टक्क्यांनी घसरला आहे. तरी देखील या कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किंट लागल्य़ाने आश्चर्य व्यक्त होत आहे. अदानी पॉवरने बुधवारी नोंदवले की डिसेंबर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा वार्षिक 96 टक्क्यांनी घसरून 8.7 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला 218.5 कोटी रुपयांचा नफा झाला होता. 

आज अदानी विल्मरचा निकालही जाहीर झाला आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. अदानी समूहाच्या या कंपनीच्या कामकाजातून मिळणारा महसूल ४४.८ टक्क्यांनी वाढून ७,७६४.४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा एकत्रित ऑपरेटिंग नफा, Ebitda वर मोजला गेला, तो 17 टक्क्यांनी घसरून 1,469.7 कोटी रुपये झाला. मागील वर्षी याच कालावधीत हे प्रमाण 1,770.8 कोटी रुपये होते.

या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत अदानी पॉवरचा करानंतरचा नफा ४०१.६ टक्क्यांनी वाढला होता. ६९५.५३ कोटी रुपये नोंद झाली होती. तर त्याच काळात गेल्या वर्षी 230.6 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. अदानी पॉवरच्या शेअरची घसरण थांबली आहे. शेअर 5 टक्क्यांनी वाढून 8.65 रुपयांनी 182 रुपयांवर बंद झाला. विल्मरच्या शेअरलाही अप्पल सर्किट लागले आहे. 

टॅग्स :अदानीशेअर बाजार