Lokmat Money >शेअर बाजार > इकडे हिंडनबर्गवरून गोंधळ होत राहिला, तिकडे अदानींनी रातोरात नवी कंपनी उभी केली

इकडे हिंडनबर्गवरून गोंधळ होत राहिला, तिकडे अदानींनी रातोरात नवी कंपनी उभी केली

गौतम अदानींनी हार मानली नाही. त्यांनी मोठमोठी कर्जे फेडली आणि याच गोंधळात अदानींनी एक नवी कंपनी उभी देखील केली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 12:31 PM2023-04-13T12:31:48+5:302023-04-13T12:32:22+5:30

गौतम अदानींनी हार मानली नाही. त्यांनी मोठमोठी कर्जे फेडली आणि याच गोंधळात अदानींनी एक नवी कंपनी उभी देखील केली. 

Adani set up a new company overnight Pelma Collieries for coal washing in the row of Hindenburg effect | इकडे हिंडनबर्गवरून गोंधळ होत राहिला, तिकडे अदानींनी रातोरात नवी कंपनी उभी केली

इकडे हिंडनबर्गवरून गोंधळ होत राहिला, तिकडे अदानींनी रातोरात नवी कंपनी उभी केली

जानेवारीच्या अखेरीस अदानी ग्रुपवर हिंडनबर्ग रिपोर्टमधून गंभीर आरोप झाले. यामुळे अदानींचे साम्राज्य धाडकन कोसळले होते. राजकीय वादही वाढू लागले होते. संसदेत हा मुद्दा गाजला होता. अदानींविरोधात मोर्चा सुरु झाला होता. त्यांनी घेतलेले कर्ज, सरकारी कंपन्यांची गुंतवणूक आदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. परंतू गौतम अदानींनी हार मानली नाही. त्यांनी मोठमोठी कर्जे फेडली आणि याच गोंधळात अदानींनी एक नवी कंपनी उभी देखील केली. 

अदानींच्या अदानी एंटरप्रायझेसने वॉशरी बिझनेसमध्ये एंट्री केली आहे. एक नवीन उपकंपनी स्थापन केली असून या कंपनीचे नाव पेल्मा कोलियरीज असे ठेवण्यात आले आहे. आता ही कंपनी अदानींच्या कोल वॉशरी बिझनेसचे काम पाहणार आहे. अदानींनी याची माहिती शेअर बाजारांना दिली आहे. 

अदानी यांनी ७ एप्रिलला ही संपूर्ण मालकीची कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीचे प्लेमा कोलियरीज लिमिटेड (PCL) अस ठेवण्यात आले आहे. 10 लाख रुपयांच्या प्रारंभिक अधिकृत भाग भांडवलासह 5 लाख रुपयांच्या पेड अप भाग भांडवलासह ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. कोळसा धुणे ही कोळशावरील अनावश्यक भाग साफ करण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये ही कंपनी काम करणार आहे. अदानींच्या कोळशाच्या खाणी आहेत. 

Web Title: Adani set up a new company overnight Pelma Collieries for coal washing in the row of Hindenburg effect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.