अदानी समूहाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. संसद असो, देश असो की परदेश, सर्वत्र कंपनीला दणका बसत आहे. या अडचणी काही प्रमाणात कमी करण्यासाठी अदानी समूहाने योजना आखली आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, अदानी समूह गुंतवणूकदारांना ॲडव्हान्समध्ये ७ ते ८००० कोटी रुपये परत करण्याची योजना आखत आहे. ईटीच्या अहवालानुसार कंपनी याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकते.
रिपोर्टनुसार, अदानी समूहाची योजना आहे की कंपनी पुढील ३० ते ४५ दिवसांत हे पैसे परत करू शकते. खरं तर, कंपनीने जागतिक बँका क्रेडिट सुइस, जेपी मॉर्गन, जेएम फायनान्शियल आणि काही म्युच्युअल फंड कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे. ज्याला कंपनी लवकरच परत करण्याची ऑफर देऊ शकते. असे मानले जात आहे की प्रमोटर कुटुंबाने आपल्या काही विद्यमान शेअरहोल्डर्स पोझिशन्स काढून घेतल्या आहेत, ज्यांनी स्ट्रॅटेजिक फायनॅन्स फॅसिलिटीचा लाभ घेतलाय आणि फंड ऑर्गनाईज करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट संपवली आहे. योजना ३०-४५ दिवसांच्या आत आहे, एलएएस पोर्टफोलिओ शून्य होणार आहे, अशी प्रतिक्रिया या प्रकरणाची माहिती ठेवणाऱ्या एका अधिकाऱ्याने दिली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदानी समूहाचे प्रवक्ते टिप्पणीसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. गुंतवणूकदारांच्या चिंता कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी, अदानी समूह अतिरिक्त शेअर सिक्युरिटीज देखील देऊ शकतो. जेपी मॉर्गन विश्लेषक वरुण आहुजा आणि अमन अग्रवाल यांनी मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले की आमची चिंता OPCO पातळीपेक्षा प्रमोटर पातळीच्या अनिश्चिततेवर आहे.
संपत्तीत घसरण
गौतम अदानी यांच्या संपत्तीत खरी घसरण २१ जानेवारीपासून सुरू झाली. तोपर्यंत हिंडेनबर्गचा रिपोर्ट समोर आला नव्हता. गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती, ज्याकडे सर्वजण सामान्यपणे पाहत होते, परंतु कुणाला काही अंदाज नव्हता की आशियातील सर्वात मोठा उद्योगपती एका मोठ्या कचाट्यात सापडणार आहे. हिंडेनबर्गचा रिपोर्ट समोर आला आणि अदानींच्या शेअर्सने गटांगळी घेण्यास सुरुवात केली. शेवटच्या ट्रेडिंग दिवसापर्यंत म्हणजेच शुक्रवार ३ फेब्रुवारीपर्यंत, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ५९ अब्ज डॉलरवर आली, म्हणजे त्यांची निम्म्याहून अधिक संपत्ती कमी झाली आहे.