Lokmat Money >शेअर बाजार > अदानी समूहाचे 2 शेअर आपटले, ₹4000 वरून ₹700 पर्यंत घसरले; आता या इंडेक्समधून होणार बाहेर!

अदानी समूहाचे 2 शेअर आपटले, ₹4000 वरून ₹700 पर्यंत घसरले; आता या इंडेक्समधून होणार बाहेर!

नुवामाच्या मते, अदानी ट्रान्समिशनमधून 189 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. तसेच, अजानी टोटल गॅसमधून 167 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही शेअर्समधून एकूण 356 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 06:06 PM2023-05-29T18:06:47+5:302023-05-29T18:09:24+5:30

नुवामाच्या मते, अदानी ट्रान्समिशनमधून 189 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. तसेच, अजानी टोटल गॅसमधून 167 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही शेअर्समधून एकूण 356 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे.

adani total gas and adani transmission share huge fall from rs4000 to rs700 | अदानी समूहाचे 2 शेअर आपटले, ₹4000 वरून ₹700 पर्यंत घसरले; आता या इंडेक्समधून होणार बाहेर!

अदानी समूहाचे 2 शेअर आपटले, ₹4000 वरून ₹700 पर्यंत घसरले; आता या इंडेक्समधून होणार बाहेर!

अदानी समूहाची (Adani group) कंपनी असलेल्या अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) आणि अदानी टोटल गॅससाठी (Adani total gas) पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण 31 मे रोजी या दोन्ही कंपन्यांना MSCI ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समधून वगळण्यात येणार आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या मते, या बदलामुळे एकूण 350 मिलियन डॉलर अथवा त्याहून अधिक काढले जाण्याची शक्यता आहे.

नुवामाच्या मते, अदानी ट्रान्समिशनमधून 189 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. तसेच, अजानी टोटल गॅसमधून 167 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही शेअर्समधून एकूण 356 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे.

अदानी ट्रान्समिशन 2% ने घसरला - 
यातच, अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी ट्रान्समिशनचा शेअर सोमवारी 2 टक्क्यांनी घसरून 825 रुपयांवर आला. सप्टेंबर 2022 मध्ये या शेअरने 4,238.55 रुपयांचा 52 आठवड्यांतील उच्चांक गाठला होता. तसेच, 1 मार्च 2023 रोजी, हा शेअर 630 रुपये या 52 आठवड्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला होता. अर्थात या काळात हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे अदानी समूहाचे सर्व शेअर्स दबावाखाली होते.

अदानी टोटल 3% घसरला - 
सोमवारच्या ट्रेडिंग दरम्यान अदानी टोटल गॅसचे शेअर जवळपास 3 टक्क्यांनी घसरून 738.55 रुपयांवर आले. या शेअरने 23 जानेवारी 2023 रोजी 3,998.35 रुपये हा 52 आठवड्यांतील उच्चांक गाठला होता. तसेच, 19 मे 2023 रोजी हा शेअर घसरून 633.35 रुपयांच्या 52 आठवड्यांतील नीचांकी पातळीवर गेला होता. केवळ 5 महिन्यांतच एवढ्या मोठ्या घसरणीचे कारण हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि कंपनीशी संबंधित काही निगेटिव्ह बातम्या हे होते.

Web Title: adani total gas and adani transmission share huge fall from rs4000 to rs700

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.