Lokmat Money >शेअर बाजार > या कंपनीमुळे गौतम अदानींना कोट्यवधीचा फटका; शेअर्सही घसरले...

या कंपनीमुळे गौतम अदानींना कोट्यवधीचा फटका; शेअर्सही घसरले...

Adani Wilmar Q2 Results : गौतम अदानी यांच्या अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 05:44 PM2023-11-02T17:44:59+5:302023-11-02T17:45:21+5:30

Adani Wilmar Q2 Results : गौतम अदानी यांच्या अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत.

Adani Wilmar Q2 Results : Due to this company, Gautam Adani suffered crores; Shares also fell | या कंपनीमुळे गौतम अदानींना कोट्यवधीचा फटका; शेअर्सही घसरले...

या कंपनीमुळे गौतम अदानींना कोट्यवधीचा फटका; शेअर्सही घसरले...

Adani Wilmar Q2 Results : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अनेक कंपन्यांचे त्रैमासिक निकाल जाहीर झाले आहेत. मात्र, यातील एका कंपनीने अदानी समूहाला मोठा झटका दिलाय. खाद्यतेलाचे उत्पादन करणाऱ्या Adani Wilmar ने सप्टेंबर तिमाहीचे निकाल (Adani Wilmar Q2 Results) जाहीर केले, त्यानुसार कंपनीला 131 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

बुधवारी तिमाही निकाल जाहीर करताना अदानी विल्मारने सांगितले की, सप्टेंबर तिमाहीत कंपनीला 130.73 कोटींचा एकत्रित तोटा झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत कंपनीला 48.76 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

कंपनीचे उत्पन्न घटले
तिमाही निकालांनुसार, सप्टेंबर तिमाहीत अदानी विल्मरच्या उत्पन्नात घट होऊन 12,331.20 कोटी रुपयांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 14,209.20 कोटी रुपये होते. म्हणजेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात एकूण 1878 कोटी रुपयांची घट झाली आहे. 

शेअरची कामगिरी
अदानी विल्मरने सप्टेंबर तिमाहीचा निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअर्सवर परिणाम दिसून आला, पण तो काही काळासाठीच होता. शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान अदानी विल्मरचा शेअर 311.85 रुपयांच्या पातळीवर घसरला होता. मात्र, दिवसभराचा व्यवहार जसजसा वाढत गेला तसतशी त्याची घसरण थांबली आणि हिरव्या चिन्हावर आला. दिवसाच्या अखेरपर्यंत शेअर वाढून 316.00 वर आला. 

(टीप-शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

Web Title: Adani Wilmar Q2 Results : Due to this company, Gautam Adani suffered crores; Shares also fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.