Join us

Afcons Infra IPO Listing: ₹४६३ चा शेअर ८% डिस्काऊंटवर लिस्ट; Shapoorji Pallonji Group च्या कंपनीनं केलं निराश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 11:16 AM

Afcons Infra IPO Listing: शापूरजी पालोनजी समूहाची इन्फ्रा इंजिनीअरिंग आणि कन्स्ट्रक्शन कंपनी एफकॉन्स इन्फ्राच्या शेअर्सनं आज देशांतर्गत बाजारात ८ टक्क्यांच्या डिस्काऊंटसह एन्ट्री घेतली.

Afcons Infra IPO Listing: शापूरजी पालोनजी समूहाची (Shapoorji Pallonji Group) इन्फ्रा इंजिनीअरिंग आणि कन्स्ट्रक्शन कंपनी एफकॉन्स इन्फ्राच्या शेअर्सनं आज देशांतर्गत बाजारात ८ टक्क्यांच्या डिस्काऊंटसह एन्ट्री घेतली. लिस्टिंगनंतर शेअरमध्ये वाढ झाली असली तरी आयपीओमधील गुंतवणूकदार अजूनही तोट्यात आहेत. आयपीओबद्दल बोलायचं झालं तर त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला हिस्साही पूर्णपणे भरला नाही. 

आयपीओ अंतर्गत ४६३ रुपयांच्या दरानं शेअर्स जारी करण्यात आले होते. परंतु ते बीएसईवर ४३०.०५ रुपये आणि एनएसईवर ४२६.०० रुपयांवर लिस्ट झाले. म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदारांना लिस्टिंग गेन मिळाला नाही, पण लिस्टिंगवर त्यांचं भांडवल सुमारे ८ टक्क्यांनी कमी झाले. लिस्टिंगनंतर शेअरमध्ये वाढ झाली. बीएसईवर तो ४४०.७० रुपयांवर (Afcons Infra Share Price) पोहोचला असला तरी आयपीओ गुंतवणूकदार अजूनही ४ टक्क्यांहून अधिक तोट्यात होते. मात्र, प्रत्येक शेअर ४४ रुपये सवलतीत मिळाल्यानं कर्मचारी मात्र नफ्यात आहेत.

आयपीओला चांगला प्रतिसाद

एफकॉन्स इन्फ्राचा ५,४३०.०० कोटी रुपयांचा आयपीओ २५ ते २९ ऑक्टोबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि एकूण २.७७ पट सब्सक्राइब झाला. यामध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा (QIB) राखीव हिस्सा ३.९९ पट, नॉन इन्स्टिट्युशन इनव्हेस्टर्सचा हिस्सा (NII) ५.३१ पट, किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा ०.९९ पट आणि कर्मचाऱ्यांसाठीचा हिस्सा १.७७ पट भरला.

या आयपीओ अंतर्गत १,२५० कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करण्यात आले आहेत. याशिवाय ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या ९,०२,८०,७७८ शेअर्सची विक्री झाली आहे. ऑफर फॉर सेलचे पैसे शेअर्स विकणाऱ्या भागधारकांना दिले जातील. नवीन शेअर्सच्या माध्यमातून जमा होणारा पैसा बांधकाम उपकरणांची खरेदी, कर्जाची परतफेड करण्यासाठी, नवीन मशिनरी खरेदी करण्यासाठी, लाँग टर्म वर्किग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल.

एफकॉन्स इन्फ्रा बद्दल

एफकॉन्स इन्फ्रा ही शापूरजी पालोनजी समूहाची इन्फ्रा इंजिनीअरिंग आणि कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. याची स्थापना १९५९ मध्ये स्थापन झाली. सप्टेंबर २०२३ पर्यंत १५ देशांमध्ये ५२.२ हजार कोटी रुपयांचे ७६ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. सप्टेंबर २०२३ पर्यंत १३ देशांमध्ये ३४.९ हजार कोटी रुपयांचे ६७ प्रकल्प आहेत. त्याचा व्यवसाय आशिया, आफ्रिका आणि मध्यपूर्वेत पसरलेला आहे.

(टीप - यामध्ये कतेवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग