Lokmat Money >शेअर बाजार > Banko Products Bonus Shares : १७ वर्षांनंतर 'ही' कंपनी पुन्हा देणार बोनस शेअर; मिळणार एकावर १ शेअर फ्री, जाणून घ्या

Banko Products Bonus Shares : १७ वर्षांनंतर 'ही' कंपनी पुन्हा देणार बोनस शेअर; मिळणार एकावर १ शेअर फ्री, जाणून घ्या

Banko Products Bonus Shares : पुन्हा एकदा या कंपनीनं बोनस शेअरची घोषणा केली आहे. कंपनीनं एका शेअरवर बोनस जाहीर केलाय.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 12:37 PM2024-11-14T12:37:45+5:302024-11-14T12:37:45+5:30

Banko Products Bonus Shares : पुन्हा एकदा या कंपनीनं बोनस शेअरची घोषणा केली आहे. कंपनीनं एका शेअरवर बोनस जाहीर केलाय.

After 17 years Banko Products company will again issue bonus shares Get 1 free share on one know record date | Banko Products Bonus Shares : १७ वर्षांनंतर 'ही' कंपनी पुन्हा देणार बोनस शेअर; मिळणार एकावर १ शेअर फ्री, जाणून घ्या

Banko Products Bonus Shares : १७ वर्षांनंतर 'ही' कंपनी पुन्हा देणार बोनस शेअर; मिळणार एकावर १ शेअर फ्री, जाणून घ्या

Banko Products Bonus Shares : पुन्हा एकदा बँको प्रॉडक्ट्सनं (Banko Products Share) बोनस शेअरची घोषणा केली आहे. कंपनीनं एका शेअरवर बोनस जाहीर केलाय. या बोनस शेअरची माहिती कंपनीनं बुधवारी शेअर बाजारांना दिली आहे.

कंपनीनं १३ नोव्हेंबर रोजी बीएसईला यासंदर्भातील माहिती दिली. २ रुपयांच्या फेस व्हॅल्यूचा एक शेअर बोनस म्हणून दिला जाईल, असं कंपनीनं म्हटलं. मात्र, कंपनीनं अद्याप या बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. येत्या काळात कंपनीकडून ही माहिती देण्यात येणार आहे.

यापूर्वी २००७ मध्ये बोनस शेअर्स

२००७ मध्ये बॅन्को प्रॉडक्ट्सच्या शेअर्सचा एक्स-बोनस स्टॉक म्हणून व्यवहार करण्यात आला होता. त्यानंतर कंपनीनं एका शेअरवर १ शेअर बोनस दिला. यावर्षी १६ फेब्रुवारी ला बॅन्को प्रॉडक्ट्सच्या शेअर्समध्ये एक्स-डिव्हिडंडचा व्यवहार झाला होता. त्यानंतर कंपनीनं प्रति शेअर २० रुपये लाभांश दिला.

शेअर बाजारात कंपनीची कामगिरी कशी?

बुधवारी बॅन्को प्रॉडक्ट्सचा शेअर ४ टक्क्यांनी घसरून ७०० रुपयांवर बंद झाला. गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत २१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर, ज्या गुंतवणूकदारांनी वर्षभर हा शेअर ठेवला असता तर त्यांच्या शेअरच्या मूल्यात आतापर्यंत १९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असती. गेल्या दोन वर्षांत बॅन्को प्रॉडक्ट्सच्या समभागांनी गुंतवणूकदारांना २६१ टक्के रिटर्न दिले आहे.
बॅंको प्रॉडक्ट्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७९८ रुपये आहे आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ५०५.३५ रुपये प्रति शेअर आहे. कंपनीचं मार्केट कॅप ५००६.३१ कोटी रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: After 17 years Banko Products company will again issue bonus shares Get 1 free share on one know record date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.