Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market : २ दिवसांनंतर शेअर बाजारात पुन्हा तेजी, गुंतवणूकदारांना ₹७५००० कोटींचा फायदा

Stock Market : २ दिवसांनंतर शेअर बाजारात पुन्हा तेजी, गुंतवणूकदारांना ₹७५००० कोटींचा फायदा

दोन दिवसांनंतर, मंगळवारी शेअर बाजाराता पुन्हा एकदा तेजी दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 04:18 PM2023-11-21T16:18:51+5:302023-11-21T16:19:02+5:30

दोन दिवसांनंतर, मंगळवारी शेअर बाजाराता पुन्हा एकदा तेजी दिसून आली.

After 2 days stock market again bullish investors gain rs 75000 crores bse nse sensex | Stock Market : २ दिवसांनंतर शेअर बाजारात पुन्हा तेजी, गुंतवणूकदारांना ₹७५००० कोटींचा फायदा

Stock Market : २ दिवसांनंतर शेअर बाजारात पुन्हा तेजी, गुंतवणूकदारांना ₹७५००० कोटींचा फायदा

दोन दिवसांनंतर, मंगळवारी शेअर बाजाराता पुन्हा एकदा तेजी दिसून आली. BSE सेन्सेक्स 275 अंकांनी वाढून बंद झाला. तर निफ्टी 19,783 अंकांवर गेला. त्यामुळे शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांना आज सुमारे ७५ हजार कोटी रुपयांचा नफा झाला. कामकाजादरम्यान कंझ्युमर ड्युरेबल्स, रियल्टी आणि कमोडिटीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. दुसरीकडे, ऑईल अँड गॅस, एनर्जी आणि कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये विक्री दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.14 टक्के आणि 0.20 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

व्यवहाराच्या अखेरिस, बीएसई सेन्सेक्स 275.62 अंकांनी किंवा 0.42 टक्क्यांनी वाढून 65,930.77 अंकांवर बंद झाला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 89.40 अंक किंवा 0.45 टक्क्यांच्या वाढीसह 19,783.40 वर बंद झाला.

गुंतवणूकदारांनी कमावले ७५ हजार कोटी
बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 328.10 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, जे त्याच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवारी 327.35 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 75,000 कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झाल्यास गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 75,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

हे शेअर्स वधारले
आज सेन्सेक्समधील 30 पैकी 18 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्येही JSW स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.76 टक्के वाढ झाली आहे. तर टाटा स्टील, टायटन, सन फार्मा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) शेअर्स सुमारे 1.24 टक्के ते 1.45 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

या शेअर्समध्ये घसरण
तर सेन्सेक्समधील 12 शेअर्स घसरणीसह बंद झाले. यामध्ये एनटीपीसीच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. तर टेक महिंद्रा, मारुती सुझुकी, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि लार्सन अँड टुब्रोचे (L&T) शेअर्स जवळपास 0.40 टक्के ते 0.63 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

Web Title: After 2 days stock market again bullish investors gain rs 75000 crores bse nse sensex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.