Share Market Update: गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आज 5 ऑक्टोबर रोजी थांबली. सेन्सेक्स 405 अंकांच्या उसळीसह बंद झाला. तर निफ्टी 19,550 च्या जवळ पोहोचला. स्मॉल कॅप शेअर्समध्येही चांगली खरेदी दिसून आली. या तेजीमुळे शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांना आज सुमारे 1.22 लाख कोटी रुपयांचा नफा झाला. कॅपिटल गुड्स, आयटी, ऑटो आणि सर्व्हिसेस सेक्टरच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. दुसरीकडे, पॉवर, युटिलिटी आणि फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरणीचा कल सुरू होता.
कामकाजाच्या अखेरच्या सत्रात, बीएसई सेन्सेक्स 405.53 अंकांनी किंवा 0.62 टक्क्यांनी वाढून 65,631.57 वर बंद झाला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 109.65 अंकांच्या किंवा 0.56 टक्क्यांच्या वाढीसह 19,545.75 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांना 1.22 लाख कोटींचा नफा
बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 5 ऑक्टोबर रोजी वाढून 317.88 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे बुधवारी 316.66 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे 1.22 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.22 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी
सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेले 30 पैकी 24 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्ये लार्सन अँड टुब्रोच्या (L&T) शेअर्समध्ये सर्वाधिक 2.06 टक्क्यांची वाढ झाली. यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा (M&M), टायटन, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि मारुती सुझुकीच्या शेअर्समध्ये 1.22 टक्के ते 1.65 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली.
या शेअर्समध्ये घसरण
तर उर्वरित सेन्सेक्सचे सहा शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यापैकी पॉवर ग्रिडचा शेअर सर्वाधिक 1.21 टक्क्यांनी घसरला. याशिवाय नेस्ले इंडिया, एनटीपीसी, एचसीएल टेक आणि बजाज फायनान्सच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली.
२ दिवसांनंतर शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्समध्ये ४०५ अंकांची वाढ; गुंतवणूकदारांनी कमावले १.२२ लाख कोटी
गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आज 5 ऑक्टोबर रोजी थांबली.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 04:23 PM2023-10-05T16:23:22+5:302023-10-05T16:23:36+5:30