शेअर बाजारात आज (गुरुवारी) टायर कंपनी असलेल्या एमआरएफच्या शेअरमध्ये जवळपास 4000 रुपयांची वाढ दिसून आली आहे. सुरुवातीच्या ट्रेडिंगदरम्यान कंपनीचा शेअर सुमारे 4.5% वाढून, म्हणजेच 4000 रुपयांनी वाढून 91888 वर पोहोचले आहेत. MRF स्टॉक हा भारतातील सर्वात महाग स्टॉक आहे. MRF ही एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही भारतातील सर्वात मोठी तर जगातील चौदाव्या क्रमांकाची टायर उत्पादक कंपनी आहे. हिचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. ही कंपनी टायर, ट्रेड्स, ट्यूब आणि कन्व्हेयर बेल्ट, पेंट्स आणि खेळण्यांसह विविध प्रकारची रबर उत्पादने तयार करते.
का वाढतोय या टायर कंपनीच्या शेअरचा भाव? -
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, डिमांड आउटलुकसंदर्भात सेक्टरचा दृष्टीकोन पॉझिटिव्ह आहे. इनपूट किंमतीत सुधारणा झाल्याने मिड लेव्हलला ऑपरेटिंग मार्जिन कामगिरीत सुधारणा झाल्याची शक्यता आहे. याशिवाय, इंफ्रास्ट्रक्चरवर सातत्याने होणारा खर्च, ऑटो एक्सपो 2023 मधील नव्या लॉन्चिंगच्या पार्श्वभूमीवर एक जबरदस्त ऑर्डर बुकिंगमुळे चांगल्या विक्रीची शक्यता आहे. यातच, NCLAT ने भारतीय स्पर्धा आयोगाला (CCI) देशांतर्गत टायर उद्योगाला संरक्षण देणाऱ्या कंपन्यांच्या कथित गटबाजीच्या बाबतीत नवीन आदेश जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. याच बरोबर CCI ने लावलेल्या दंडाचा रिव्ह्यू करण्यासंदर्भातही सांगण्यात आले आहे.
एका वर्षात 16,134 रुपयांनी वाढला शेअर -
MRF चा स्टॉक एका वर्षात 21% अर्थात 16,134 रुपयांनी वधारला आहे. या दरम्यान हा शेअर 74,000 रुपयांनी वाढून 90,224 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच, ट्रेडिंगच्या गेल्या पाच दिवसांत हा शेअर जवळपास 3% ने वधारला. या कंपनीचे मार्केट कॅप 38,255.1 कोटी रुपये आहे. MRF शेअरची 52 आठवड्यांतील हाय लेव्हल 95,954.35 रुपये तर लो लेव्हल 62,944.50 रुपये आहे.