Join us

₹9 च्या शेअरनध्ये आली जबरदस्त तेजी, एका घोषणेनंतर लागलं 20% चं अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 9:28 PM

व्यवहाराच्या शेवटी शेअरची किंमत 9 रुपये होती. 

शेअर बाजारात बुधवारी चढ-उताराचे वातावरण दिसून आले. अशा वातावरणात मेटलशी संबंधित कंपनी- बोथरा मेटल्स अँड अ‍ॅलॉयज लिमिटेडच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी राहिली. या पेनी स्टॉकमध्ये 20 टक्यांचे अपर सर्किट लागले. व्यवहाराच्या शेवटी शेअरची किंमत 9 रुपये होती. 

या शेयरची किंमत 23 नोव्हेंबर 9.43 रुपयांवर होती. हा या शेअरच्या 52 आठवड्यांचा उच्चांक होता. याच वर्षाच्या मार्च महिन्यात या शेअरची किंमत 2.30 रुपये एवढी होती. हा या शेअरचा 52 आठवड्यांतील नीचांक होता. वार्षिक आधारावर या शेअरमध्ये 210 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. बोथरा मेटल्स अँड अ‍ॅलॉयजने सप्टेंबर सहामाहिचे निकाल जाहीर केले आहेत. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे.  

2013 मध्ये आला होता आयपीओ: बोथरा मेटल्स अँड अ‍ॅलॉयजचा आयपीओ 2013 मध्ये आला होता. 10 रुपये एवढी पेस व्हॅल्यू असलेल्या या आयपीओची इश्यू प्राइस 25 रुपये एवढी होती. याची लॉट साइज 6000 शेअर्सची होती.

बाजाराची स्थिती - एका दिवसाच्या घसरणीनंतर बुधवारी चढ-उताराच्या व्यवहारात स्थानिक शेअर बाजारात किंचित वाढ झाली आहे. 30 शेअर्सवर आधारलेला बीएसई सेन्सेक्स 33.57 अंक अथवा 0.05 टक्क्यांच्या वाढीसह 69,584.60 अंकांवर बंद झाला. या व्यवहारादरम्यान एक वेळ हा 450.47 अंकांपर्यंत घसरला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 19.95 अंकांच्या अथवा 0.10 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 20,926.35 अंकांवर बंद झाला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार