Lokmat Money >शेअर बाजार > Block Deal नंतर 'हा' शेअर सुस्साट, ९ टक्क्याची वाढ; मार्केट गुरूंनी दिला 'लाँग टर्म'साठी खरेदीचा सल्ला

Block Deal नंतर 'हा' शेअर सुस्साट, ९ टक्क्याची वाढ; मार्केट गुरूंनी दिला 'लाँग टर्म'साठी खरेदीचा सल्ला

शेअर बाजारात योग्य शेअरमध्ये गुंतवणूक केली, तर नक्कीच नफा मिळतो. शेअर बाजारातून नफा कमवायचा असेल तर तुमच्यात संयम असणं आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 02:12 PM2023-06-21T14:12:12+5:302023-06-21T14:12:57+5:30

शेअर बाजारात योग्य शेअरमध्ये गुंतवणूक केली, तर नक्कीच नफा मिळतो. शेअर बाजारातून नफा कमवायचा असेल तर तुमच्यात संयम असणं आवश्यक आहे.

after Block Deal shriram finance share up by 9 percent Market guru anil singhvi give buying advice for long term investment tips | Block Deal नंतर 'हा' शेअर सुस्साट, ९ टक्क्याची वाढ; मार्केट गुरूंनी दिला 'लाँग टर्म'साठी खरेदीचा सल्ला

Block Deal नंतर 'हा' शेअर सुस्साट, ९ टक्क्याची वाढ; मार्केट गुरूंनी दिला 'लाँग टर्म'साठी खरेदीचा सल्ला

जर तुम्ही अभ्यासपूर्वक शेअर बाजारात योग्य शेअरमध्ये गुंतवणूक केली, तर नक्कीच नफा मिळतो. शेअर बाजारातून नफा कमवायचा असेल तर तुमच्यात संयम असणं आवश्यक आहे. जर चुकीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला नुकसानही सोसावं लागू शकतं.

दरम्यान, मार्केट गुरू अनिल सिंघवी यांनी शेअर बाजारातून नफा मिळवण्यासाठी एका स्टॉकची निवड केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या शेअरची चर्चादेखील आहे. मार्केट गुरू अनिल सिंघवी यांनी आपण या स्टॉकची लेव्हल देत नाही असं म्हटलं. गुंतवणूकदारांना हवं असल्यास ते कॅश किंवा फ्युचर्स मार्केटमधून कोणत्याही खरेदी करू शकतात. मात्र, अनिल सिंघवी यांनी खरेदीचा सल्ला दिला आहे.

Shriram Finance Fut ची निवड 
ज्या किमतीत ब्लॉक डील होत आहे त्याच किमतीला हा शेअर खरेदी करावा असा सल्ला सिंघवी यांनी दिलाय. स्टॉप लॉस बद्दल सांगायचं झालं तर ब्लॉक डील किमतीच्या 1 टक्के खाली स्टॉप लॉस ठेवा आणि 3-5 टक्के अपसाईडसाठी खरेदी करा. टार्गेट प्राईज ब्लॉक डीलच्या किमतीपेक्षा 3 ते 5 टक्के अधिक सेट केली जाऊ शकते. हा शेअर नक्की घ्यावा, असंही ते म्हणाले.

का करावी खरेदी?
ब्लॉक डीलद्वारे 3.2 कोटी शेअर्सची ब्लॉक डील झाली आहे. ब्लॉक डीलनंतरच शेअरमध्ये 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते. अनिल सिंघवी यांनी हा शेअर ब्लॉक डील किमतीच्या आसपास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

लाँग टर्मचा विचार करा
या शेअरमध्ये 10-20 टक्क्यांची वाढ दिसून येऊ शकते असे सिंघवी म्हणाले. गुंतवणूकदारांनी फक्त या शेअरमध्ये कोणत्या लेव्हलवर खरेदी करायची हे ठरवायचं आहे. शेअर खरेदी नक्की करा पण त्याची लेव्हल पाहिली पाहिजे. लाँग टर्मच्या दृष्टीनं हा शेअर खरेदी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

(टीप- यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणाकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: after Block Deal shriram finance share up by 9 percent Market guru anil singhvi give buying advice for long term investment tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.