Join us  

लिस्ट होताच पैसे डबल, ₹१०० वर आलेला IPO, पहिल्याच दिवशी ₹१९९ वर पोहोचला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 12:15 PM

कंपनीच्या शेअर्सनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.

Shri Balaji Valve Components IPO: नवीन वर्षात श्री बालाजी व्हॉल्व्ह कंपोनेंट्सच्या शेअर्सची शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री झाली. कंपनीच्या शेअर्सनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. श्री बालाजी व्हॉल्व्ह कंपोनेंट्सचे शेअर्स बीएसईवर 90 टक्क्यांच्या प्रीमियमसह 190 रुपयांवर लिस्ट झाले. दसम्यान लिस्टिंगनंतर शेअर 199.50 रुपयांवर पोहोचला. याचा अर्थ असा की ज्या गुंतवणूकदारांना हा IPO मिळाला होता त्यांना पहिल्याच दिवशी 100% नफा मिळाला. श्री बालाजी वाल्व्‍ह कंपोनेंटस् IPO चा प्राइस बँड 100 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता.27 डिसेंबरला ओपन झालेला इश्यूकंपनीचा आयपीओ 27 डिसेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आणि 29 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. श्री बालाजी व्हॉल्व्ह कॉम्पोनंट्स IPO अलॉटमेंटची तारीख सोमवार, 1 जानेवारी 2024 रोजी निश्चित करण्यात आली होती. शेअर्स बीएसई SME वर लिस्ट झाले आहेत. या IPO ला गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद मिळाला. हा इश्यू 276 पेक्षा जास्त पट सबस्क्राईब झाला. रिटेल कॅटेगरीमध्ये 169.95 पट, क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स (QIB) कॅटेगरीत 70.04 पट आणि नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स कॅटेगरीत (NII) 799.70 पट आयपीओ सबस्क्राईब झाला होता.21.60 कोटींचा आयपीओ₹21.60 कोटीचा श्री बालाजी व्हॉल्व्ह कंपोनेंट्सचा आयपीओ हा संपूर्णपणे 21.60 लाख इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आहे. IPO चा प्राइस बँड प्रति शेअर ₹95 ते ₹100 दरम्यान निश्चित करण्यात आला होता. श्री बालाजी व्हॉल्व्ह कॉम्पोनंट्स आयपीओचे रजिस्ट्रार बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहेत. आयपीओमधून उभारलेला निधी सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी, खेळत्या भांडवलाची आवश्यकता आणि अतिरिक्त प्लांट आणि मशिनरी उभारण्यासाठी वापरण्याची कंपनीची योजना आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. )

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक