Join us

सोमवारच्या घसरणीनंतर, आज सेन्सेक्स निफ्टीमध्ये तेजी; अपोलो हॉस्पिटल वधारला, बजाज ऑटोमध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 9:35 AM

शेअर बाजाराचं कामकाज मंगळवारी तेजीसह सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स 73520 अंकांच्या पातळीवर उघडला.

Stock Market Open: शेअर बाजाराचं कामकाज मंगळवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 18 अंकांनी वधारून 73520 अंकांच्या पातळीवर तर निफ्टी सात अंकांच्या वाढीसह 22,340 अंकांच्या पातळीवर उघडला. काही वेळातच सेन्सेक्समध्ये 100 अकांपेक्षा अधिक वाढ झाली.  

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी आयटी निर्देशांक तेजीत होते तर, निफ्टी स्मॉल कॅप, निफ्टी बँक, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस निर्देशांक घरसणीसह कार्यरत होते. निफ्टी फार्मा, निफ्टी ऑटो, निफ्टी आयटी निर्देशांकात वाढ दिसून आली. 

प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये, बीएसई सेन्सेक्स 14 अंकांच्या वाढीसह 73516 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता, तर निफ्टी दोन अंकांच्या वाढीसह 22334 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. गिफ्ट निफ्टीमधून शेअर बाजाराची सुरुवात मजबूत नोटेवर होऊ शकते असे संकेत मिळाले होते. आशियाई शेअर बाजारांमध्ये तेजीचा कल होता आणि त्यामुळे भारतातील शेअर बाजाराचे कामकाजही तेजीत सुरू होण्याची अपेक्षा होती. 

कोणत्या शेअर्समध्ये तेजी / घसरण? 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात अपोलो हॉस्पिटल, सिप्ला, टाटा कंझ्युमर आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली होती, तर पॉवर ग्रिड, नेस्ले इंडिया, एसबीआय लाइफ यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह ट्रेड करत होते. 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात अदानी पोर्ट्स, बीपीसीएल, टीसीएस, इन्फोसिस, टाटा मोटर्स, एचसीएल टेक आणि टाटा स्टीलचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते, तर आयटीसी, ब्रिटानिया, एचयूएल, नेस्ले, एचडीएफसी लाईफ, बजाज फिनसर्व्ह आणि जेएसडब्ल्यूच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत होती.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार