Join us

मर्जरच्या बातमीनंतर दिग्गज स्टिल कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 12:53 PM

बीएसईवर या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत...

शेअर बाजारात जिंदल स्टेनलेस लिमिटेड (Jindal Stainless Limited) आणि जिंदल स्टेनलेस (हिसार) लिमिटेडच्या शेअरमध्ये बुधवारीही तेजी दिसून आली. बीएसईवर कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत. महत्वाचे म्हणजे या दोन्ही कंपन्यांचे मर्जर होत आहे. या कंपन्यांच्या मर्जरसाठी रेकॉर्ड डेट 9 मार्च 2023 आहे.

जिंदल स्टेनलेस हिसार लिमिटेडच्या बोर्डाच्या बैठकीनंतर, या कंपनीचे मर्जर जिंदल स्टेनलेस लिमिटेडमध्ये करणे निश्चित झाले. रेकॉर्ड डेटपर्यंत जिंदल स्टेनलेस हिसार लिमिटेड कंपनीचे शेअर्स होल्ड करणाऱ्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर जिंदल स्टेनलेस लिमिटेडचा 1.95 शेअर मिळेल.

कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी - जिंदल स्टेनलेस लिमिटेडचा शेअर बुधवारी बीएसईवर 4.14 टक्क्यांच्या वाढीसह 311.85 रुपयांवर बंद झाला होता. यापूर्वी कालचा शेअर 52 आठवड्यांतील उच्च पातळीवर म्हणजेच 329 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या एका महिन्यादरम्यान 24 टक्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. 6 महिन्यांपूर्वी जिंदल स्टेनलेस लिमिटेडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 150 टक्क्यांच्या जवळपास फायदा झाला आहे.

जिंदल स्टेनलेस हिसारचा शेअरमध्ये एनएसईवर 5 टक्क्यांपेक्षाही अधिकची तेजी बुधवारी दिसून आली. यानंतर कंपनीचा शेअर 570 रुपयांवर पोहोचला. तसेच, गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये 18 टक्क्यांपेक्षाही अधिकची तेजी दिसून आली. गेल्या 6 महिन्यांत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 120 टक्क्यांहून अधिकचा परतावा मिळाला आहे. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकबाजार