Join us  

पैसे तयार ठेवा! Ola electric नंतर आता येणार Ather Energy चा IPO

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 3:33 PM

Ather Energy IPO : भांडवल उभारण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ather energy लवकरच IPO आणण्याच्या तयारीत आहे. सेबीकडे पुढील आठवड्यात कंपनीकडून कागदपत्रे जमा केली जाऊ शकतात. 

Ather Energy IPO Latest Update : इलेक्ट्रिक टू व्हिलर उत्पादक कंपनी एथर एनर्जी ४५०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याची तयारी करत आहे. कपंनी IPO च्या माध्यमातून हा पैसा जमवणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनी पुढील आठवड्यात भांडवली बाजार नियंत्रक संस्था 'सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया' अर्थात सेबीकडे कागदपत्रे सादर करू शकते. 

गेल्या महिन्यात एथर एनर्जीने आपल्या गुंतवणूकदारांसोबत नॅशनल इन्व्हेस्टमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंडच्या माध्यमातून नवीन फंडिंग राऊंडमध्ये तब्बल ७.१ कोटी डॉलरचा भांडवल जमवले आहे. त्यामुळे एथर एनर्जीची व्हॅल्यूएशन १.३ अरब डॉलरवर पोहोचली आहे. आणि एथर एनर्जी यूर्निकॉर्न स्टार्टअच्य कॅटेगरीमध्ये पोहोचली आहे. 

हीरो मोटो कॉर्प आहे भागधारक

एथर एनर्जीने २०२३ च्या अखेरीपासून अनेक पातळ्यावरून फडिंग जमवले आहे. या वर्षी मे मध्ये एथर एनर्जीने डेट आणि इक्विटीच्या माध्यमातून २८६ कोटी रुपयांचा फंड उभा केला. हे फडिंग मुख्यतः व्हेंचर डेट आणि को-फाऊंडर्सच्या माध्यमातून जमा केले गेले. 

व्हेंचर डेट फर्म स्ट्राइड व्हेंचर्सने डिचेंबरच्या माध्यमातून एथर एनर्जीमध्ये २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. स्टार्टअपचे को-फाऊंडर तरुण संजय मेहता आणि स्वप्निल जैन यांनी सीरीज एफ प्रेफरन्स शेअर्सच्या माध्यमातून ४३.२८ कोटींची गुंतवणूक केली आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये हीरो मोटोकॉर्पने एथर एनर्जीमध्ये ५५० कोटींची गुंतवणूक करण्याला बोर्डाने मंजुरी दिल्याची घोषणा केली होती. 

स्पर्धक Ola Electric चा ऑगस्टमध्ये आला होता IPO

एथर एनर्जीची प्रतिस्पर्धी कंपनी ओला इलेक्ट्रिकचा या वर्षी ऑगस्टमध्ये आयपीओ आला होता. आयपीओच्या माध्यमातून ओला इलेक्ट्रिकने ६ हजार १४६ कोटी रुपयांचे भांडवल उभे केले. ऑगस्टमध्ये शेअर बाजारात ओला लिस्ट झाली. 

ओला इलेक्ट्रिकचे शेअर ९ ऑगस्ट रोजी लिस्टिंगच्या दिवशी बीएसईमध्ये ९१.१८ रुपयांवर बंद झाला होता. आतापर्यत ओला इलेक्ट्रिकच्या शेअरची किंमती २० टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीचे मार्केट कॅप ४८,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 

टॅग्स :व्यवसायशेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगइलेक्ट्रिक कार / स्कूटरओला