Lokmat Money >शेअर बाजार > हिंडेनबर्ग रिपोर्टचा परिणाम फूस्स! अदानींचा हा स्वस्तातला मस्त शेअर बनला रॉकेट, रोजच लागतंय अपर सर्किट 

हिंडेनबर्ग रिपोर्टचा परिणाम फूस्स! अदानींचा हा स्वस्तातला मस्त शेअर बनला रॉकेट, रोजच लागतंय अपर सर्किट 

गेल्या चार दिवसांत या शेअरमध्ये 22 टक्क्यांहूनही अधिकची तेजी दिसून आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 01:15 PM2023-02-21T13:15:17+5:302023-02-21T13:16:41+5:30

गेल्या चार दिवसांत या शेअरमध्ये 22 टक्क्यांहूनही अधिकची तेजी दिसून आली आहे.

After the Hindenburg report adani power share hits upper circuit delivered 22 percent return in 5 days | हिंडेनबर्ग रिपोर्टचा परिणाम फूस्स! अदानींचा हा स्वस्तातला मस्त शेअर बनला रॉकेट, रोजच लागतंय अपर सर्किट 

हिंडेनबर्ग रिपोर्टचा परिणाम फूस्स! अदानींचा हा स्वस्तातला मस्त शेअर बनला रॉकेट, रोजच लागतंय अपर सर्किट 

अदानी ग्रुपच्या एका शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून येत आहे. कंपनीचा शेअर आज मंगळवारीही 5% च्या अपर सर्किटवर ट्रेड करत आहे. अदानी पॉवरचा शेअर ट्रेडिंगच्या गेल्या चार दिवसांपासून सातत्याने अपर सर्किटला हिट करत आहे. अदानी पॉवरचा शेअर 171 रुपयांवर पोहोचला आहे. व्यवहाराच्या गेल्य पाच दिवसांत हा शेअर जवळपास 22% ने वधारला आहे.

हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर 38% कोसळला भाव - 
गेल्या चार दिवसांत या शेअरमध्ये 22 टक्क्यांहूनही अधिकची तेजी दिसून आली आहे. मात्र हा शेअर 24 जानेवारीपासून अर्थात हिंडेनबर्गने रिसर्च रिपोर्ट जारी केल्यापासून अद्यापपर्यंत जवळपास 38 टक्क्यांनी खाली आहे. यातच, ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आता अदानी समूह पीटीसी इंडिया लिमिटेडची (PTC India Ltd) हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी बोली लावणार नाही. यापूर्वी, अदानी समूह या सरकारी क्षेत्रातील कंपनीत वाटा खरेदी करण्यास उत्सुक असल्याचे वृत्तही होते.

माध्यमांतील वत्तांनुसार, यासंदर्भात अधिक माहिती असलेल्या लोकांचे म्हणणे आहे की, सध्या अदानी ग्रुप कॅश वाचविण्यावर अधिक भर देत आहे. अदानी पॉवरने यापूर्वी डीबी पॉवरसोबतची डीलही कॅन्सल केली आहे.

100 अब्ज डॉलरपेक्षाही खाली आलाय एमकॅप -
अदानी समूहाच्या 10 कंपन्यांचा संयुक्त इक्विटी बाजार कॅप मंगळवारी 100 अब्ज डॉलरच्याही खाली आला आहे. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण दिसून आली. आता अदानी समूह आपल्या गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे.
 

Web Title: After the Hindenburg report adani power share hits upper circuit delivered 22 percent return in 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.