Join us

लिस्ट झाल्यानंतर 'या' दिग्गज कंपनीचा शेअर करत होता मालामाल, आता गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 2:57 PM

Ola Electric Mobility Share Price : हा स्टॉक शेअर बाजारात लिस्ट होताच त्यानं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं होतं, पण आता त्यांच्यावर डोकं धरुन बसण्याची वेळ आलीये. ७६ रुपयांवर लिस्ट झाल्यानंतर काही दिवसांनी या शेअरमध्ये तेजी दिसून आली होती

Ola Electric Mobility Share Price : ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्समधील तेजी कमी होताना दिसत आहे. हा स्टॉक शेअर बाजारात लिस्ट होताच त्यानं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं होतं, पण आता त्यांच्यावर डोकं धरुन बसण्याची वेळ आलीये. ७६ रुपयांवर लिस्ट झाल्यानंतर काही दिवसांनी या शेअरमध्ये तेजी दिसून आली होती आणि तो १५७.४० रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला.

मात्र यानंतर त्यात घसरण दिसून आली. सोमवारी दुपारी कामकाजादरम्यान ११४.५५ रुपयांवर आला. २० ते २० टक्क्यांचं अपर सर्किट लागून उच्चांकी स्तरावर पोहोचलेल्या या शेअरमध्ये आता घसरण दिसून येत आहे. ज्यांनी ५ दिवसांपूर्वी ज्यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांनी ११ टक्क्यांहून अधिक तोटा सहन करावा लागत आहे. मात्र, लिस्टिंगच्या दिवशी ज्यांनी शेअर्स खरेदी केले, त्यांना हा शेअर अजूनही जवळपास २६ टक्के रिटर्न देत आहे. 

एचएसबीसीनं दिलं १४० रुपयांचं टार्गेट

एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्सनं (इंडिया) ओला इलेक्ट्रिकवर कव्हरेज सुरू केलं होतं आणि या शेअरला १४० रुपयांचं टार्गेट दिलं होतं. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचं झाल्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार यापासून दूरच आहेत. तर देशांतर्गत इन्स्टिट्युशनल बायर्सचा हिस्सा १.१५ टक्के आणि १४.४७ टक्के शेअर्स पब्लिक होल्डिंग आणि अन्यंकडे आहेत. ओला इलेक्ट्रिकमध्ये ८४.२८ टक्के हिस्सा प्रमोटर्सकडे आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकओला