Lokmat Money >शेअर बाजार > निकालानंतर रॉकेट तेजीनं वाढला 'हा' शेअर, २ दिवसांत ३८ टक्क्यांची तेजी

निकालानंतर रॉकेट तेजीनं वाढला 'हा' शेअर, २ दिवसांत ३८ टक्क्यांची तेजी

कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 15 टक्क्यांहून अधिक वाढून 487 रुपयांवर पोहोचले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 03:53 PM2023-11-24T15:53:34+5:302023-11-24T15:54:42+5:30

कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 15 टक्क्यांहून अधिक वाढून 487 रुपयांवर पोहोचले.

After the result mamaearth share rose sharply 38 percent in 2 days know details | निकालानंतर रॉकेट तेजीनं वाढला 'हा' शेअर, २ दिवसांत ३८ टक्क्यांची तेजी

निकालानंतर रॉकेट तेजीनं वाढला 'हा' शेअर, २ दिवसांत ३८ टक्क्यांची तेजी

होनासा कंझ्युमर या मामाअर्थ (Mamaearth) उत्पादनांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 15 टक्क्यांहून अधिक वाढून 487 रुपयांवर पोहोचले. होनासा कंझ्युमरचे शेअर्स शुक्रवारी 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. गेल्या 2 दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये 38.31 टक्क्यांची वाढ झाली. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ सप्टेंबरच्या तिमाहीत प्रचंड नफा कमावल्यानंतर झाली आहे.

30 कोटींचा नफा
चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत होनासा कन्झुमरनं 29.4 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 93 टक्क्यांची वाढ झाली. होनासा कंझ्युमरनं गेल्या वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत 15.2 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीत कंपनीचा महसूल 21 टक्क्यांनी वाढून 496 कोटी रुपये झाला. कंपनीनं गेल्या वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत 410 कोटी रुपयांचा महसूल कमावला होता.

संमिश्र प्रतिसाद
मामाअर्थ (Mamaearth), द डर्मा (The Darma) आणि बीब्लंट (BBlunt) सारख्या सुप्रसिद्ध ब्रँडची मूळ कंपनी होसाना कन्झ्युमरच्या (Honasa Consumer) शेअर्सनं 7 नोव्हेंबरला शेअर बाजारात एन्ट्री घेतली. कंपनीच्या IPO ला पहिल्या दोन दिवसात फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता आणि शेवटच्या म्हणजे तिसऱ्या दिवशीच आयपीओ पूर्णपणे सबस्क्राईब झाला. एकूण आयपीओ सात पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झाला होता. आयपीओ अंतर्गत 324 रुपये किमतीला शेअर्स जारी करण्यात आले.

होनासा कन्झ्युमरचा 1701 कोटी रुपयांचा आयपीओ 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. या आयपीओला गुंतवणूकदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि तो शेवटच्या दिवशी तो पूर्णपणे सबस्क्राईब झाला.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीपूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: After the result mamaearth share rose sharply 38 percent in 2 days know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.